Amol Kolhe News: 'घोडा मैदान जवळच आहे, बारीला तयार रहा'; अमोल कोल्हेंनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले ?

Shrikant Shinde and Amol Kolhe: खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमोल कोल्हेंना दिला 'हा' सल्ला
Dr.Amol Kolhe
Dr.Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यातील भाजप-शिंदे गटाने जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षही कामाला लागले आहेत. जागावाटपावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि बैठकांचा धडाका सुरु आहे.

याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खुद्द कोल्हे यांनी या संदर्भातले संकेत दिले आहेत. "आता घोडा मैदान जवळच आहे, बारीला तयार रहा", असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr.Amol Kolhe
Abu Azami : सरकारला वाद वाढवायचाय; अबू आझमी आरोप करत वादाच्या स्थळी न येता फिरले मागे

"राज्यातील राजकारणाची परिस्थिती बैलगाडा शर्यतीसारखी झाली आहे, बारी नंबरात बसवायला कुठलाही बैल आणा पण बारी नंबरातच बसवा, हे धोरण सरकारने अवलंबलं आहे. मात्र, जोपर्यत विकासाचा गाडा नंबरात येत नाही, तोपर्यत सरकारची बारी बसलीय, असं म्हणता येणार नाही", अशा शब्दात खासदार कोल्हेंनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालासह दुधाला बाजार भाव, तरुणांची नोकरी, याकडे लक्ष केंद्रीत करत आता घोडा मैदान जवळच आहे, बारीला तयार रहा, असे म्हणत खासदार कोल्हे यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकल्याचे संकेत दिले. याबरोबरच राज्य सरकारच्या कारभाराची अवस्था बैलगाडा शर्यतीसारखी झाल्याचा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

शिरुर तालुक्यातील कवठे येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटातून खासदार कोल्हे बोलत होते. दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारच्या कारभाराची अवस्था बैलगाडा शर्यतीसारखी झाल्याची टीका केली. या टिकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

श्रीकांत शिंदेंनी अमोल कोल्हेंना दिला 'हा' सल्ला

"महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना साडेबारा हजार कोटींची मदत देण्यात आली, महायुतीचे सरकार शेतकऱ्यांसोबत उभे आहे. टीका टिप्पणी करण्यापेक्षा अमोल कोल्हे यांनी आपल्या मतदारसंघात येणारी निवडणूक कशी जिंकणार, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, टीका टिप्पणी करणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने त्यांचे स्थान दाखवून दिले आहे, या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले, येणाऱ्या काळात लोकांसाठी काम करा, टीका टिपणी करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलंय, येणाऱ्या निवडणुकीत आपले स्थान कसे काय पक्क ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करा", असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी खासदार कोल्हे यांना दिला.

Edited by Ganesh Thombare

Dr.Amol Kolhe
Maratha Reservation : शंभूराज देसाईंनी सांगितली मराठा आरक्षणाची न्यायालयीन स्ट्रॅटेजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com