Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी पुन्हा 'ट्रॅक'वर; लोकसभेसाठी असा ठरला फॉर्म्युला ?

Maha Vikas Aghadi Lok Sabha Election : महाविकास आघाडीचं लोकसभेसाठी ठरलं ?
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी करत आहेत, तर महाविकास आघाडीतील पक्षही कामाला लागले असून, भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीत सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील दिग्गज नेत्यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला नेमकं कसा असणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांपैकी आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढणार ?, याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maha Vikas Aghadi
Maharashtra Congress: महाराष्ट्रात लवकरच काँग्रेसचा मोठा धमाका; नाना पटोलेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

महाविकास आघाडीचं लोकसभेसाठी जागावाटप जवळपास निश्चित झालं असून, लोकसभेच्या 46 जागा लढण्याचा मविआचा निर्धार आहे, तर दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ठाकरे गट 22 जागांवर लढण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या वाट्याला 14 जागा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 जागांवर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याबरोबरच मविआ अकोल्याची एक जागा वंचित बहुजन आघाडीला आणि हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देण्याची शक्यता आहे. मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून लवकरच महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार असून, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर लोकसभेसाठीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे.

सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील निवडणुकीत काँग्रेसचे नेते प्रचारात गुंतलेले आहेत. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून या जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला हा 2019 मध्ये ज्या जागा निवडून आल्यात त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबरोबरच महाविकास आघाडीचा मुंबईतील जागावाटपाचा फॉर्म्युलाही लवकरच ठरणार आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णयावेळी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, हे लवकरच समोर येणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

Maha Vikas Aghadi
jitendra Awhad : वर्षभरापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अशी केली होती कटकारस्थानावर मात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com