कोरोना लशीचा बूस्टर डोस घेताय? अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा

कोरोना लशीचा तिसरा डोस (Precaution dose) घेण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.
Adar Poonawalla
Adar Poonawalla Sarkarnama

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला (Vaccination) सुरूवात झाल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांसाठी पहिले दोन डोस मोफत दिले होते. तसेच खासगी रुग्णालयांत पैसे देऊन डोस घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. पण आता तिसरा म्हणजे प्रतिबंधात्मक डोस (Precaution dose) घेण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे. सुरवातीला एका डोसची 600 रुपये असलेली ही किंमत 225 रुपयांवर आणल्याची मोठी घोषणा अदर पूनावाला (Adar Poonwalla) यांनी केली आहे. (Corona vaccine)

कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस 600 रुपयांना मिळेल, अशी घोषणा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली होती. यानंतर आज त्यांनी नवीन घोषणा करून या डोसची किंमत केल्याचे जाहीर केले. पूनावाला यांनी म्हटले आहे की, पूनावाला यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सिरमने कोव्हिशिल्ड लशीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्ड 600 रुपयांना देण्यात येणार होती. आता तिची किंमत प्रतिडोस 225 रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधात्मक डोस घेण्याची सूचना केली आहे. या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो.

Adar Poonawalla
गृह विभागाच्या अपयशाची चर्चा अन् मुख्यमंत्री ठाकरे 'अॅक्शन मोड'वर; पोलीस आयुक्त थेट 'वर्षा'वर

खासगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड (Covid 19) प्रतिबंधक लशीचे डोस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी लसीकरण केंद्रांवर 10 एप्रिल पासून 18 वर्षांवरील वयोगटाला खबरदारीचे डोस देण्यास सुरुवात होईल. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झालेले सर्वजण यासाठी पात्र असतील. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

Adar Poonawalla
उपसभापतिपदाचा सकाळी राजीनामा अन् दुपारी लागली मंत्रिपदाची लॉटरी

तिसरा डोस यांना मिळणार मोफत

देशातील 15 वर्षांवरील वयोगटापैकी सुमारे 96 टक्के लोकांना किमान एक तर सुमारे 83 टक्के लोकांना आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील लोकांना 2.4 कोटींहून अधिक खबरदारीच्या लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 12 ते 14 वयोगटातील 45% लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. सरकारी लसीकरण केंद्रांद्वारे पात्र लोकसंख्येसाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी तसेच आरोग्यसेवा कर्मचारी, आघाडीवर कार्यरत कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वयोगटासाठी खबरदारीचा डोस देण्याचा मोफत लसीकरण कार्यक्रम सुरुच राहील तसेच त्याला गती दिली जाईल, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात लं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com