अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने निधन

त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होता.
Sindhutai Sapkal Passed Away

Sindhutai Sapkal Passed Away

sarkarnama

पुणे : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (ता. ४ जानेवारी) रात्री सव्वा आठच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. (Sindhutai Sapkal passes away of heart attack)

गॅलॅक्सि केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्यांच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.”

Sindhutai Sapkal Passed Away

गोपीचंद पडळकरांसह त्यांच्या भावाविरोधात ॲट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा

सिंधुताई यांना दीड महिनाभरापूर्वी हर्नियाचा त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Sindhutai Sapkal Passed Away

राजकीय हिशेब चुकते करण्यास एकत्र आलेल्या विरोधकांना पवारांनी दाखवला कात्रजचा घाट!

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. त्यांनी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांना सांभाळत असत. संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, यासाठीही त्यांचे प्रयत्न असायचे. अनाथ आणि बेवारस मुलांना आधार देण्याचे फार मोठे काम सिंधुताई यांनी आपल्या जीवनात केले.

Sindhutai Sapkal Passed Away

निर्मला जागडेंच्या विजयाने वेल्ह्याला तब्बल २५ वर्षांनंतर मिळाले दोन संचालक!

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना पद्म श्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com