Manoj Jarange Patil Rally : अंतरवाली सराटीच्या जरांगे पाटलांच्या सभेत घुमणार खेडच्या 'गुड्डू'चा आवाज !

Maratha Reservation News : एरवी सहाशे भोंग्यांच्या एका दिवसाच्या भाड्यापोटी सहा लाख रुपये मोजावे लागतात.
Manoj Jarange Patil Rally
Manoj Jarange Patil RallySarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : मराठा आरक्षण मागणीसाठी आपला जीव पणास लावलेले मनोज जरांगे पाटील यांनी त्याकरिता राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे पुढील दिशा ठरविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केलेल्या जालन्यातील अंतरवाली सराटीतच ते उद्या जंगी सभा घेणार आहेत. लाखोंची उपस्थिती अपेक्षित असलेल्या या सभेसाठी आठशे भोंगे लावण्यात आले असून, त्यातील तब्बल सहाशे हे खेड तालुक्याच्या (जि.पुणे) भांबुरवाडीतील तरुण ज्ञानेश्वर भांबुरे ऊर्फ गुड्डूने मोफत लावले आहेत.

एरवी सहाशे भोंग्यांच्या एका दिवसाच्या भाड्यापोटी सहा लाख रुपये मोजावे लागले असते. पण,समाजासाठी खारीचा वाटा म्हणून ही सेवा देऊ केल्याचे ज्ञानेश्वर याने अंतरवाली सराटी येथून 'सरकारनामा'ला सांगितले. तेथील तयारीचा ऑंखो देखा हाल त्याने कथन केला. या सभेसाठी साठ जेसीबींनी पावणेदोनशे एकर जागा सपाट केली. (Maratha Reservation)

Manoj Jarange Patil Rally
Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; आता उपअधीक्षकांमार्फत समन्स !

सभेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अगोदरच पन्नास एकर जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील २५ गावांनी एक लाख समाजबांधवाच्या जेवण आणि मुक्कामाचीही सोय केली आहे. हजारो लाेक आजच तेथे मिळेल त्या वाहनाने दाखल झाले आहेत.

समाजाकडून या सभेच्या तयारीसाठी स्वयंस्फूर्तीने मदतीचा ओघ सुरू आहे. एकाने तब्बल पावणेतीन कोटी रुपये किमतीची जेवणाची पॅकेट दिली आहेत. पन्नास गाड्या आणि दहा टायर ट्रक भरून बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या सभास्थानी आल्या आहेत.(Manoj Jarange Patil)

सोशल मीडियावरील या सभेची तयारी पाहून ज्ञानेश्वरनेही जरांगे-पाटील यांना आपल्या परीने मदत म्हणून भोंगे बसविण्याची जबाबदारी उचलली. योगी व्हाईस नावाने तो अशा ऑर्डर घेतो. पण, त्याच्याकडे फक्त दीडशे भोंगे होते, मग त्याने आपली साउंड बॉक्स विकून नवीन भोंगे घेतले. ते स्वखर्चाने घेऊन तो दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीत दाखल झाला. आपल्या वीस सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने हे भोंगे बसविले आहेत.(Antarwali Sarati)

ऑक्टोबर हिट आणि नवी मुंबईत झालेली दुर्घटना विचारात घेऊन सायंकाळी पाच वाजता ही सभा आय़ोजित करण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. तिच्या तयारीसाठी मिळणारा उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद पाहून या सभेला लाखोंची गर्दी होईल, अशी पोलिस खात्याची माहिती आहे.

Manoj Jarange Patil Rally
Baramati Lok Sabha : अमेठीनंतर आता बारामतीचाही 'नंबर'; सुळेंच्या पराभवाचा बावनकुळेंना 'कॉन्फिडन्स'

या सभेसाठी जरांगे-पाटलांनी राज्यभर घेतलेल्या तयारीच्या सभांचाही प्रतिसाद राज्य सरकारला धडकी भरवणाराच होता. उद्या तर रेकॉर्डब्रेक गर्दी होईल, असा पोलिसांचाच अंदाज आहे. कारण या सभेच्या ठिकाणी ३५ मोठे एलईडी स्क्रीन, आठ पॉवर स्पीकर आणि आठशे भोंगे लावण्यात आले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Patil Rally
Manoj Jarange Rally In Antarwali : अंतरवालीच्या सभेत आठशे भोंग्यांतून घुमणार जरांगेंचा आवाज...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com