एसटी कामगारांचे प्रश्‍न सोडवा; अन्यथा...

आजपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ३५ कामगारांनी आत्महत्या केल्या.
 एसटी संप-जगदीश मुळीक
एसटी संप-जगदीश मुळीक सरकारनामा

पुणे : राज्य सरकारने एसटी कामगारांचे प्रश्‍न तातडीने सोडवावेत अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला आहे. मुळीक यांनी पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकत जाऊन एसटी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या बंदला पाठिंबा दिला. यावेळी मुळीक बोलत होते.

 एसटी संप-जगदीश मुळीक
महापालिकेत समाविष्ट गावातील वादग्रस्त नोकरभरतीचा तपास होणार एका महिन्यात

मुळीक म्हणाले, ‘‘ राज्यातील अकार्यक्षम महाविकास आघाडी सरकार केवळ आणि केवळ वसुली आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये सरकारला अजिबात स्वारस्य राहिलेले नाही. एसटी कामगारांची अर्थिक स्थिती कोलमडण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.’’

 एसटी संप-जगदीश मुळीक
महापौर मोहोळांचा Happy Birthday : पुण्यासाठी ठरणार रक्तदान महासंकल्प दिवस

गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यातील एक लाखांहून अधिक कामगारांचे पगार झालेले नाही. असे मुळीक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘साडेतीनशे कामागरांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. आजपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ३५ कामगारांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारला याचे गांभीर्य नाही. केवळ आर्यनखान आणि नवाब मलिकांच्या जावयाला निर्दोष ठरविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दिवस-रात्र कार्यरत असल्याची राज्यातील नागरिकांची भावना झाली आहे.सरकारने तातडीने एसटी कामागरांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.’’

ऐन दिवाळीत एसटीचा संप सुरू झाल्याने दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या व दिवाळीनंतर परत शहरात येणाऱ्या नागरीकांचे खूप हाल होत आहेत. राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य केल्या असत्या तर नागरीकांचे आतोनात हाल टळले असते, अशी असे मुळीक यांनी सांगितले. या सरकारला प्रश्‍नांची जाणीव आणि गांभीर्य नाही, असा आरोप मुळीक यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com