गणेश विसर्जन मिरवणुकीत पुण्यात वीस वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं...

पुण्यनगरीतील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच असते.
Ganesh Immerssion Procession
Ganesh Immerssion ProcessionSarkarnama

पुणे : पुण्यनगरीतील (Pune) पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Immerssion procession) म्हणजे गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच असते. गणरायाचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे, गणेशभक्तांची ओसंडून वाहणारी गर्दी अन् लाऊडस्पीकरचा दणदणाटही. दरवर्षीच्या पुण्यातील मिरवणुकीचं हे वैशिष्ट्य. मात्र, मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळं विसर्जन मिरवणूक रद्द करावी लागली. त्यामुळं यंदा मागील वीस वर्षांतील ध्वनी पातळीचा विक्रम मोडला गेला आहे. (Sound Level in Ganesh Immerssion procession lower in twenty years)

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (COEP) विद्यार्थ्यांकडून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत लक्ष्मी रस्त्यावर ध्नवी पातळीचे मापन केलं जातं. यंदा मिरवणूक रद्द करण्यात आली असली तरी हे मापन करण्यात आलं. वाद्यांचा आवाज नसल्यानं विसर्जन मार्गावरील 10 चौकांत नेहमीप्रमाणे आवाजाची पातळी नोंदवली असला या वर्षीची सरासरी केवळ 59.8 डेसिबल्स इतकी सुसह्य आढळून आल्याची माहिती महाविद्यालयातील जीवशास्त्र, अपयोजित विज्ञान विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. महेश शिंदीकर यांनी दिली.

Ganesh Immerssion Procession
कॅप्टन नाही अन् सिद्धूही नाही! राहुल गांधींनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

यंदा पुण्यात आढळेली ध्वनी पातळी मागील वीस वर्षांतील सर्वात कमी नोंदवली गेली आहे. रविवारी (ता.19) दुपारी 12, 4, रात्री 8 आणि सोमवारी (ता. 20) मध्यरात्री 12, पहाटे 4 व सकाळी 8 वाजता मोजण्यात आली आहे. बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक, उंबऱ्या गणपती चौक, शेडगे विटोबा चौक, होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक आणि खंडूजीबाबा चौक या दहा चौकांमध्ये हे मापन करण्यात आलं.

दहाही चौकांमध्ये मिळून सरासरी ध्वनी पातळी 59.8 डेसिबल्स एवढी नोंदवली गेली आहे. ही पातळी मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे सहा डेसिबल्सने कमी आहे. गेल्या दोन दिवसांतील लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनी पातळी दिवसा 67.1 आणि रात्री 45.2 नोंदली गेली. म्हणजेच ती नियमानुसार ठरवलेल्या मर्यादेच्या आसपास आढळून आली. मागील वर्षीही मिरवणूक रद्द करण्यात आली होती.

यंदाची ध्वनी पातळी 2001 पासूनच्या सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी नोंदवली गेली आहे. 2013 मध्ये सर्वाधिक 114.4 डेसिबल्स एवढी ध्वनी पातळी होती. वीस वर्षांत पाचवेळा ही सरासरी 100 डेसिबल्सच्या पुढे गेली होती. तर यंदा पहिल्यांदाच 60 डेसिबल्सच्या खाली आली आहे. महाविद्यालयातील मुरली कुंभारकर, नागेश पवार, पद्मेश कुलकर्णी, शुभम पाटील, विनीत पवार, बालाजी नावंदे आणि शुभम अलटे या विद्यार्थ्यांनी ध्वनी पातळी मोजली आहे.

विसर्जन दिवसाची सरासरी ध्वनी पातळी :

वर्ष ध्वनी पातळी वर्ष ध्वनी पातळी
2001
90.7 2002 90.9
2003 91.5 2004 92.8
2005 94.1 2006 96.2
2007 102.6 2008 101.4
2009 79.14 2010 100.9
2011 87.4 2012 104.2
2013 114.4 2014 96.3
2015 96.6 2016 92.6
2017 90.9 2018 90.4
2019 86.2 2020 65.5
2021 59.8

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com