Srirang Barane vs Sanjog Waghere: 'सगळे 25 लाख मतदार माझे नातेवाईक' म्हणत बारणेंचा प्रतिस्पर्धी वाघेरेंना टोला!

Maval Lok Sabha Constituency : नवा भिडू का रूसला का? महायुतीच्या उमेदवाराच्या फ्लेक्सवर इंजिन असूनही `मनसे`चे स्थानिक नेते आलेच नाहीत.
Srirang Barane vs Sanjog Waghere: 'सगळे 25 लाख मतदार माझे नातेवाईक' म्हणत बारणेंचा प्रतिस्पर्धी वाघेरेंना टोला!
Sarkarnama

Loksabha Election 2024 : मावळातील लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी महायुतीची पहिली पत्रकारपरिषद सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये झाली.त्यात बारणेंनी तुफान फटकेबाजी केली.त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स दिसला. गतवेळच्या 2 लाख 4 हजार मतांपेक्षाही जास्त लीडने निवडून येणार असल्याचा मोठा दावा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान,महायुतीला नुकताच पाठिंबा दिलेल्या `मनसे`चे पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन चिखलेंसह त्यांचा एक सुद्धा पदाधिकारी यावेळी हजर नसल्याने त्याची मोठी चर्चा झाली.दुसरीकडे या परिषदेच्या फ्लेक्सवर `मनसे`(MNS)सह महायुतीतील सहाही राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे होती.पुण्यात मनसेची बैठक असल्याने चिखले येऊ शकले नसल्याचे बारणेंनी यावर सांगितले. दरम्यान,चिखलेंशी यासंदर्भात वारंवार संपर्क करुनही तो झाला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Srirang Barane vs Sanjog Waghere: 'सगळे 25 लाख मतदार माझे नातेवाईक' म्हणत बारणेंचा प्रतिस्पर्धी वाघेरेंना टोला!
Shrirang Barne News : श्रीरंग बारणेंनी प्रतिस्पर्धी संजोग वाघेरेंना अगदीच हलक्यात घेतलं; नेमकं काय म्हणाले?

महायुतीचे पुणे जिल्ह्यातील बारामती,शिरुर आणि पुणे लोकसभेचे उमेदवार हे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र,बारणे(Srirang Barane) तो 22 तारखेला महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार सभा घेणार असून देवेंद्र फडणवीस हे घाटाखाली पनवेल येथे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे घाटावर मावळात त्या घेणार आहेत.

बारणेंनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली.प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे ते माहीत नाही, उमेदवारी दाखल केल्यानंतर ते कळेल, असे म्हणत त्यांनीी आपले मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यांची दखल घेतली नाही. वाघेंरेकडून नात्यागोत्याचे राजकारण केले जात असल्याबद्दल विचारले असता, मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत,असा टोला बारणेंनी मारला.

Srirang Barane vs Sanjog Waghere: 'सगळे 25 लाख मतदार माझे नातेवाईक' म्हणत बारणेंचा प्रतिस्पर्धी वाघेरेंना टोला!
Amol Kolhe Vs Ajit Pawar : पलटीसम्राट अन्‌ खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगला; कोल्हेंचा अजितदादांवर प्रतिहल्ला

अजितदादा बारणेंच्या प्रचाराला मात्र, पार्थ....-

अजित पवार(Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी गेल्या निवडणुकीत पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर पार्थ आपल्या प्रचाराला येणार का?, असा प्रश्न केला असता त्यांना विनंती करणार आहोत. पण, त्यांच्या मातोश्री बारामतीतून निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठी जबाबदारी आहे, असे सांगत ते येणार नाहीत,असे बारणेंनी अप्रत्यक्षपणे मान्य केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com