Pune News : धक्कादायक : शंभर रुपयांसाठी विद्यार्थ्यावर हल्ला ; हात मनगटापासून निखळला..

Pune News : चतुश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
Pune News
Pune News sarkarnama

Pune News : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune)मानवतेचा काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यात त्याचा हात मनगटापासून कापला गेला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

पु्ण्यातील पाषाण भागात ही घटना घडली आहे. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात पंकज तांबोळी हा जखमी झाला आहे. त्याचा मित्र आशुतोष माने (२४) याने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (१८) आणि गौरव गौतम मानवतकर (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pune News
West Bengal: भष्ट्राचारी नेत्यांचे दाबे दणाणले ; TMC चा मोठा निर्णय

३१ डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे आशुतोष माने , साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्या ठिकाणी मोटारसायकलवरून २ मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे शंभर रूपयांची मागणी केली.

Pune News
TDP : 'भारत जोडो' नंतर आता आणखी एक पदयात्रा ; 'या' राज्यात नवं नेतृत्व येतयं उदयास

पंकजने पैसे नसल्याचे त्यांना सांगितले. त्या दोन मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवून पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले आहे. चतुश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com