UPSC Result : 'युपीएससी'त 'सारथी'चे यश ; 17 उमेदवार प्रशासकीय सेवेसाठी सज्ज !

Saarthi News : विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य केल्यापैकी..
UPSC Result : Saarthi News
UPSC Result : Saarthi News Sarkarnama

Pune News : केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच (यूपीएससी) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेचे यशाचा ठसा उमटला आहे. सारथी या संस्थेने प्रायोजित केलेल्या उमेदवारांनी यश मिळवले. सारथीच्या तब्बल 17 उमेदवार युपीएसीच्या निकालात यश मिळवले आहे.

UPSC Result : Saarthi News
UPSC Result : 'यूपीएससी'त मुलींच्या यशाची गुढी उंच; 'टॉप फोर'मध्ये मारली बाजी !

सारथी संस्थेतर्फे युपीएससीच्या मुख्य परीक्षा आणि मुलाखत यासाठी एकूण 39 उमेदवारांना अर्थसाहाय्य देण्यात आले होते. यापैकी 17 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. सारथीच्या यशाचा टक्का हा 50 टक्क्यांच्या जवळपास आहे. आता हे 17 उमेदवार प्रशासकीय सेवेत रूजू होण्यास सज्ज आहेत.

UPSC Result : Saarthi News
Rahul Gandhi News : नवा वाद ; काँग्रेसकडून राहुल गांधींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना..? काय आहे प्रकरण?

सारथीच्या या 39 उमेदवारांपैकी प्रतिक अनिल जरड (पुणे), ऋषिकेश हनमंत शिंदे (सांगली), अर्पिता अशोक ठुबे (ठाणे), सोहम सुनील मांढरे (पुणे), मंगेश पिराजी खिलारी (अहमदनगर), सागर यशवंत खर्डे (अहमदनगर), आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), शशिकांत दत्तात्रय नरवाडे (धाराशिव), स्वप्नील चंद्रकांत बागल (हिंगोली)

लोकेश मनोहर पाटील (जळगाव), प्रतीक्षा संजय कदम (सातारा), मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), करण नरेंद्र मोरे (सातारा), शिवम सुनील बुरघाटे (अमरावती), शिवहार चक्रधर मोरे (नांदेड), राजश्री शांताराम देशमुख (अहमदनगर), महारुद्र जगन्नाथ भोर (अहमदनगर) या 17 उमेदवारांनी परीक्षेत यश मिळवले आहे. ही माहितीसारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com