Sudhir Mungantiwar On NCP: '' बॅनर लावून मुख्यमंत्री होता आले असते तर...''; सुधीर मुनगंटीवारांचा मिश्किल टोला

NCP News : ...तर फडणवीसांनी त्याची दखल घेतली पाहिजे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहेत. तसेच मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीत गटबाजी असल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावरुनच भाजप नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झळकलेल्या बॅनरवरही भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले,मुख्यमंत्री अजितदादा, जयंत पाटील असे बॅनर आहे म्हणजे गटबाजी आहे असे होत नाही. बॅनर लावून मुख्यमंत्री होता आले असते तर अनेक मुख्यमंत्री झाले असते अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Sudhir Mungantiwar
MPSC Students Protest : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

संजय राऊतांवर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले, त्यांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही. पण त्यांच्यामुळेच शिवसेनेवर आज ही वेळ आली. बाळासाहेब ठाकरे यांनी शाखाप्रमुख जन्माला घातला. आज त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या शाखा प्रमुख, खासदार, आमदारांना तुम्ही बिकावू म्हणतात. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात बोलत आहात.तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, पण तुम्ही बदनाम करत आहेत असा हल्लाबोलही सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungatiwar) यांनी केला आहे.

... तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे!

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी यांनी गृहमंत्री व मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं असून त्यात एकनाथ शिंदे यांचे चिंरजीव व खासदार श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी मला मारण्याची सुपारी असा गंभीर आरोप केला आहे. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला ही सुपारी दिली आहे असं देखील राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राऊतांनी तसं पत्र लिहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली पाहिजे. तसेच त्यांना पोलीस संरक्षणही दिलं पाहिजे.

Sudhir Mungantiwar
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? युक्तीवादात सिब्बलांनी दिले उत्तर...

अजित पवारांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख...

राष्ट्रवादीच्या गोटातून जयंत पाटील हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा संकेत देण्यात आले होते. पण आता अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेलं पोस्टर झळकल्यानं राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार शर्यत असल्याची चर्चा सुरु आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स झळकले आहेत. यावर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजितदादा अशी कॅप्शनही दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com