दिलीप मोहितेंच्या मंत्रिपदाच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली!

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना मंत्रिपद देण्याची समर्थकांची मागणी
Dilip Mohite

Dilip Mohite

sarkarnama

चाकण (जि. पुणे) : हिवाळी अधिवेशनात विधानसभेत तडाखेबंद भाषण करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) आणि भाजपला (bjp) टोले लगावणारे खेडचे राष्ट्रवादीचे (ncp) आमदार दिलीप मोहिते (Dilip mohite) यांना मंत्रिपद देण्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे. मंत्रिपदाची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत असली तरी मोहितेंची ती इच्छाही लपून राहिलेली नाही. त्यांनी अनेकदा तशी इच्छा बोलून दाखवली आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या मंत्रीपदासाठी कौल देतील का, हे पाहणे महत्वाचे आहे. (Supporters demand to give ministerial post to Khed MLA Dilip Mohite)

पुणे जिल्ह्यात खेड तालुक्याला एकदाही मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. माजी आमदार (स्व.) नारायण पवार यांनी अनेकवेळा मंत्रिपदाची मागणी केली. त्यांनाही वीस वर्षांच्या आमदारकीच्या काळात मंत्रिपद मिळालेले नाही. त्या रोषातूनच (स्व.) माजी आमदार नारायण पवार यांनी वेगळा मार्ग निवडून पाचव्या वेळी आमदारकीची निवडणूक अपक्ष लढविली होती, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

<div class="paragraphs"><p>Dilip Mohite </p></div>
एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून उठविण्याचा प्लॅन ठरला...

आमदार नारायण पवार यांचा पराभव करूनच दिलीप मोहिते आमदार झाले होते. मोहिते यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे, त्यामुळेच त्यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून तसेच उद्योजक गणेश काळे व इतरांकडून करण्यात येत आहे. आमदार मोहिते यांनी नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत सरकारची बाजू भक्कमपणे मांडत भाजपवर तोफ डाग लागली होती. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला होता.

<div class="paragraphs"><p>Dilip Mohite </p></div>
हर्षवर्धन पाटील ब्रीच कँडीत दाखल

विधानसभेतील त्यांच्या भाषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणत व्हायरल झाले आहे. खेड तालुक्याच्या विकासाबाबत आमदार मोहिते हे कायम आग्रही असतात. स्पष्ट वक्ते म्हणून आमदार मोहितेंची ओळख आहे. अडचणीतील कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी मोहितेंचा कायम पुढाकार असतो. कार्यकर्त्यांचा ते अर्ध्या रात्रीही फोन घेतात, ही त्यांची खासियत आहे. कार्यक्षम असलेले आमदार मोहिते यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या क्षमतेला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार या मागणीचा विचार येत्या मंत्रिमंडळ विस्तारात करतील का, याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे डोळे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com