सव्वा तीन वर्षांनंतर `डीएसके` तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून डीएसकेंना अखेर जामीन
DSK
DSKsarkarnama

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 400 हून अधिक गुन्हे दाखल असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. उच्च न्यायालयाने डीएसके यांचा जामीन फेटाळला होता. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. सुमारे सव्वी तीन वर्षांनंतर डीएसके तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मूळ गुन्ह्यात डीएसके, त्यांच्या कुटुंबीयांना मार्च २०१९ साली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. तर डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबर्इ उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२१ साली जामीन मंजूर केला आहे. सदनिका विकत घेतलेल्या नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेऊन फ्लॅटचा ताबा दिला नाही म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यात डीएसके यांना येथील सत्र न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केलेला आहे. याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गेेले सव्वा तीन वर्षे तुरुंगात असलेल्या डीएसकेंवर तेथे एका आमदाराने चावा घेऊन हल्ला केल्याच्या प्रकाराचीही चर्चा होती.

डीएसके यांच्यावर दाखल असलेला खटला काही महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी मुंबर्इत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात सुरू आहे. डीएसके प्रकरणात सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांची एक हजार १०० कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोषारोपपत्रही दाखल केले आहे. डीएसके, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (एमपीआयडी) न्यायालयात गुंतवणूकदारांची फसवणूक (एमपीआयडी) कायद्यानुसार सुनावणी सुरू होती. तसेच हे प्रकरण ईडीमध्ये देखील दाखल आहे. त्यामुळे मुंबईत एमपीआयडी आणि ईडी दोन्ही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. खटला सुरू असताना डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि ॲड. रितेश येवलेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. डीएसके यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४०० च्या वर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com