Supriya Sule On BJP: भाजपविरोधात बोलले की काहीतरी कटकारस्थान होतेच; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Narendra Modi, Devendra Fadnavis : पावसाने नागपूरचा विकास उघडा पडला
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

NCP Political News: केंद्र सरकार किंवा भाजपविरोधात काही बोलले तर सत्तेचा गौरवापर केला जातो. यातून आमच्याविरोधात भाजप काहीतरी कटकारस्थान करतातच. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर दडपशाही वाढवायची. एका चॅनलवर केलेली बंदी हे त्याचेच आणखी एक जिवंत उदाहरण आहे, असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर केला आहे. (Latest Political News)

बारामतीत एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी सुप्रिया सुळे (Supriya Sule) बोलत होत्या. या वेळी त्यांनी भाजप विरोधकांसह माध्यमांचाही आवाज कसा दाबते, याबाबत खंत व्यक्त केली. दरम्यान, राज्यातील एका चॅनलवर ७२ तासांची बंदी आणण्याच्या प्रकाराला न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे चाप बसला. याबाबत प्रश्न विचारला असता, सुळेंनी भाजपवर कडक शब्दांत निशाणा साधला.

Supriya Sule
India Vs Canada : कॅनडाच्या संरक्षण मंत्र्याला उपरती; म्हणाले, 'आमच्यासाठी भारत महत्त्वाचाच...'

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघ मजबुतीसाठी सुळे अॅक्टिव्ह झाल्या आहेत. दरम्यान, बारामतीतून सुनेत्रा पवार खासदारकीची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. याबाबत छेडले असता त्या म्हणाल्या, दिल्लीत काय दडपशाही चालते, हे संपूर्ण देश पाहतो; पण आम्ही लोकशाहीचा पुरस्कार करतो. माझ्याविरोधात तीन वेळा भाजप लढला आहे, याही वेळेस कोणीतरी लढणारच. लोकशाही टिकण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याचे सर्वांनीच स्वागत करायला हवे.'

विशेष अधिवेशनातून काहीही हाती लागले नसल्याची टीकाही सुळेंनी केली आहे. त्या म्हणाल्या, पाच दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनात किमान एक दिवस किमान मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. महागाई बेरोजगारी यावर चर्चा झाली नाही. अधिवेशनात स्वार्थासाठी जुमलेबाजी केली, पण लोकांच्या पदरात काहीही पडलेले नाही.(Maharashtra Political News)

पावसामुळे नागपूरची झालेल्या अवस्थेवर सुळे म्हणाल्या, भाजपचे नेतृत्व पक्ष फोडणे, घर फोडणे, एजन्सीचा वापर यातच मग्न असतात. परिणामी त्यांना विकासासाठी वेळच नाही. देवेंद्र फडणवीस जालन्याच्या घटनेच्या वेळेस प्रचाराला गेले होते. गाडी अडविणे करू नये, ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा मानसन्मान व्हायला हवा. मात्र, देवेंद्रजींनी पक्ष फोडण्याऐवजी विकासाकडे दिला असता, तर कदाचित नागपूरकरांवर हा दिवस आला नसता, अशी खोचक टीकाही केली.

जुनी संसद आवडते

या देशाचा सगळा इतिहास जुन्या संसदेच्या वास्तूत आहे. त्या भिंती बोलक्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अनेक थोर व्यक्तींची परंपरा आहे. तेथील १५ ऑगस्ट १९४७ चे नेहरूंचे भाषण आजही सर्वांच्या लक्षात आहे. स्वातंत्र्याचा सर्व लढा या वास्तूने पाहिलेला आहे. त्यामुळे माझे त्या वास्तूशी भावनिक नाते आहे. या वास्तूत आम्ही अनेक दिग्गजांकडून काहीतरी शिकलो आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Edited by Sunil Dhumal)

Supriya Sule
Shivsena MLA Disqualification : शिवसेनेचे १६ आमदार अपात्र होणार? सत्तासंघर्षाची दिशा आज ठरणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com