Supriya Sule News: वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी जोरदार हल्ला केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या देखील निशाणावर टिंगरे आहेत. वडगाव शेरीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात खासदार सुळे यांनी टिंगरे यांच्यासोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पोर्शकार अपघात प्रकरणी प्रश्न विचारत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
'वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडाने मते मागणार? त्यांच्या दोन्ही हातावर खून आहेत. गुन्हेगार आहेत हे लोक आणि म्हणतात मी काही केले नाही. पोलिस स्टेशन, ससून रुग्णालयात कोणी फोन केले? प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? देवेंद्रजी तुम्हाला आम्हाला उत्तर द्यावे लागेल. मी फक्त लोकप्रतिनिधी नाहीये. पण मी आईसुद्धा आहे. आई म्हणून जाब विचारते या सरकारला', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'खोके सरकार भ्रष्ट सरकार असून महागाई वाढवत आहे. अशा सरकारला हद्दपार करा. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात त्यामुळे देवेंद्रजी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली पाहिजे. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना तुम्ही अटक केली. पण देशमुखांवर काहीही आरोप सिद्ध झाले नाहीत.'
पोर्शकार अपघातातील आरोपीला वाचविण्यासाठी रक्त बदलण्याचे पाप केले. आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला दिली. अशी मस्ती घरी दाखवा. पोलिस स्टेशन म्हणजे तुमच्या घराचा डायनिंग टेबल नाही. पोर्शे कारने खून केलेल्या निष्पाप दोन जणांच्या आई-वडिलांचे अश्रू पुसायला तुम्ही मध्य प्रदेशला जाणार आहात का? असा सवाल सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना विचारला.
मृतांच्या आईला न्याय देण्यासाठी मी वडगांवशेरीच्या आमदारा विरुद्ध जंग जंग पछाडून न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशा प्रवृतीना घरी बसविण्याची जबाबदारी वडगावशेरीवांल्यावर आहे, असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी केली.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.