Narendra Modi : संविधान बदलाच्या नेरेटिव्हला संसदेत उत्तर? नरेंद्र मोदींचा 'मास्टर प्लॅन'

Narendra Modi constitution joint session of Parliament : 26 नोव्हेंबर 1989 ला राज्यघटनेला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे तो दिवस 2015 पासून 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच संविधान दिन सुरू केला आहे.
Constitution, PM Narendra Modi
Constitution, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या संविधान बदलाच्या प्रचाराचा भाजपला फटका बसला . लोकसभेनंतर देखील काँग्रेसकडून हा मुद्दा संसदेत वारंवार उपस्थित केला जातो आहे. त्या विरोधात भाजप 'संविधान सन्मान' असे कार्यक्रम आयोजित करून काँग्रेसला प्रत्युत्तर देत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर राज्यघटना स्वीकारून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधीच नवीन संसद भवनात संयुक्त अधिवेशन बोलवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. या विषयीचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यघटनेचे रक्षणकर्ते आपण आहोत. काँग्रेस कशी राज्यघटना विरोधी आहे, हे मुद्दे भाजप नेत्यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणार असल्याचीही सांगितले जात आहे.

हिवाळी अधिवेशन हे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाते. मात्र, 26 नोव्हेंबरला राज्यघटना मंजूर झाली होती. त्याच दिवशी संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा प्रयत्न असणार आहे. 26 नोव्हेंबर 1989 ला राज्यघटनेला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे तो दिवस 2015 पासून 'संविधान दिन' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच सुरू केला आहे.

Constitution, PM Narendra Modi
Prakash Awade and Suresh Halvankar : 'आम्ही आमच्या पक्षात घेतले, आम्हालाच बाहेर काढू नका' ; हळवणकरांचा आवाडेंना चिमटा!

निवडणुकीची अडचण

महाराष्ट्र आणि झारखंडची विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्राची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रकावर संयुक्त अधिवेशनाचे वेळापत्रक अवलंबून असणार आहे.

राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी या दौऱ्यात पुन्हा एकदा संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या कोल्हापुरमधील भाषणाच्या केंद्रस्थानी संविधान हाच विषय होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संविधान हाच मुद्दा असणार असल्याचे दिसत आहे.

Constitution, PM Narendra Modi
Swabhimani Shetkari Sanghtana: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'स्वाभिमानी' करणार मोठा धमाका; शेट्टींच्या हालचाली वाढल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com