
पुणे : महागाईच्या विषयात सरकार असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज पुण्यात केली. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात असतानादेखील केंद्र या विषयात गांभीर्याने काहीच करायला तयार नाही, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पुण्यात कोथरूडला आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य आणि मध्यमर्गीयांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत., असा आरोप खासदार सुळे यांनी केला.
लोकसभेतदेखील या विषयावर सातत्याने आवाज उठविला आहे. मोफत धान्य दिल्याचे सरकार सांगत आहे. धान्य दिल्याबद्दल सरकारचे आभार माना अशी भाषा भाजपाचे नेते वापरत आहेत. गरीबाला मदत केल्यानंतर त्याला आभार मानायला सांगणाऱ्या सरकारची किती मस्ती आहे पाहा, असे सांगत केंद्र सरकारच्याविरोधात आक्रमक भूमिका खासदार सुळे यांनी घेतली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या एक महिला असूनही महागाईमुळे महिलांना होणारा त्रास त्यांच्या लक्षात येत नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या. लोकसभेत इतकी चर्चा झाल्यानंतरदेखील हे सरकार काहीच उपायोजना करायला तयार नाही. या सरकारला सामान्य माणसाच्या संवेदना कळत नाहीत. सामान्यांचे होणारे हाल सरकारच्या लक्षात येत नाहीत, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.