Supriya Sule News : 'भीती कशाचीच नाही पण...'; बारामतीबाबत सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या?

Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानापूर्वी अनुचित प्रकार घडण्याची चर्चा होती. त्याबाबत अनेक माध्यमांमधून दबक्या आवाजात बोलले जात होते.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Baramati Politics : बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत असली तर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्यात टशन सुरू असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती राखण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जोरदार फिल्डिंग लावली आहे. यातून मतदानाच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकार होण्याची भीती खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली होती. यातून त्यांनी मतदारसंघात मतदान केंद्र अतिसंवेदनशील करण्याची मागणी प्रशासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी बारामतीतील रिमांड होम या मतदान केंद्रात मंगळवारी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानापूर्वी अनुचित प्रकार घडण्याची चर्चा होती. त्याबाबत अनेक माध्यमांमधून दबक्या आवाजात बोलले जात होते. लोकशाहीत मतदानावेळी गैरप्रकार होऊ नये, ते टाळण्यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावी, अशी मागणी केली होती, असे सुळेंनी सांगितले.

लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर काही चुकीचे प्रकार होऊ नये, या काळजीपोटी ही मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करावीत, अशी मागणी आपण चिंतेपोटील केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघात पैसे वाटपाच्या चर्चा आहेत. त्याबाबत भोर व बारामती Baramati शहरातून सोमवारी (ता. 6) रात्री सातत्याने फोन येत होते. आता पोलिसांनी जे सत्य आहे, त्याला पारदर्शकपणे न्याय द्यावा, असे आवाहनही सुळेंनी यावेळी केले.

विरोधकांकडून पैसे वाटपाच्या प्रश्नावर मतदारसंघात अशा काही घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले. वेल्ह्यामध्ये सोमवारी रात्री पुणे जिल्हा बँक PDCC सुरू होती. भोरमध्ये पैसे असलेली गाडी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बारामतीतही पैसे वाटपाची माहिती आहे. त्यामुळेच अशा तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या बाबत माझ्याकडे तक्रारी केल्या, त्या सर्वांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रारी करण्यास सांगितले आहे. पैसे वाटपातून मतदानावर परिणाम होईल की नाही, याचा फारसा विचार करत नाही, असेही सुळे म्हणाल्या.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com