Swaragate Rape Case: स्वारगेट शिवशाही बस अत्याचार पीडितेच्या प्रश्नानं पोलिसांच्या माना खाली! काय म्हणाली?

Swargate Bus Stand Rape Case News Update: योगेश कदम यांनी केलेल्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. कदम यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचे बॅनर घेत विरोधकांनी आज विधीमंडळ आवारात आंदोलन केले.
Swaragate Rape victim questions police
Swaragate Rape victim questions policeSarkatnama
Published on
Updated on

Pune News:स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये नराधम दत्ता गाडे याने एका युवतीवर अत्याचार केले. याप्रकरणी सध्या तो पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. तपासात पीडितेने पोलिसांना जाब विचारला आहे. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल संबधित युवतीनं केला आहे. पोलिस तिच्या प्रश्नाने निरुत्तर झाले आहेत.

दत्ता गाडे याचा तपास लष्कर पोलिस करीत आहेत. गाडे हा तपासाला सहकार्य करीत नसल्याचे माहिती समोर आली आहे. पोलिसांना तो उडवाउडवीची उत्तर देत आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. कदम यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचे बॅनर घेत विरोधकांनी आज विधीमंडळ आवारात आंदोलन केले.

स्वारगेट बलात्कार प्रकरणांमध्ये महिलेची बदनामी करणारे विधान अन् वृत्त येत असल्याने याच्यावर बंदी घालावी, असा अर्ज पुण्यातील विधिज्ञ असीम सरोदे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र डूडी यांच्याकडे अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. तेव्हा पीडित तरुणीने पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला, त्यावेळी अधिकाऱ्यांच्या माना खाली गेल्याचं दिसले.

Swaragate Rape victim questions police
Maharashtra Budget 2025: संभाजी महाराजांसोबत तुलना करणं अनिल परबांना महागात पडणार; निलंबनासाठी सत्ताधारी आक्रमक

दत्ता गाडेला अटक केल्यानंतर त्याचे नवीन कारनामे उघडकीस येत आहे.पोलिसाच्या गणवेशातील त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पोलिस असल्याचे भासवून तो महिलांना फसवत असल्याचे तपासात समोर आले आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे लॉजच्या बाहेर छुप्या पद्धतीने चित्रिकरण करुन त्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचे आढळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com