Swarget Bus Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट; दत्ता गाडेच्या मोबाईलमधील फोटो पोलिसांच्या हाती

Swarget Bus Rape Case Datta Gade Viral Photo: गाडे पोलिस असल्याचे सांगून एसटी स्थानक परिसरात मिरवत असल्याचे वृ्त त्याच्या अटकेपूर्वी प्रसिद्ध झाले होते, त्याच पुरावा यानिमित्ताने मिळाला आहे
Swarget Bus Rape Case news
Swarget Bus Rape Case newsSarkarnama
Published on
Updated on

स्वारगेट एसटी स्थानक बलात्कार प्रकरणात अटकेच असलेला आरोपी दत्ता गाडे याचे आणखी काही कारनामा आता उघड होत आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो आढळून आले आहेत. त्याने पोलिसांचा गणवेश अंगावर परिधान केल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

गाडे पोलिस असल्याचे सांगून एसटी स्थानक परिसरात मिरवत असल्याचे वृ्त त्याच्या अटकेपूर्वी प्रसिद्ध झाले होते, त्याच पुरावा यानिमित्ताने मिळाला आहे. पोलिसाच्या पोशाखातील त्याचा फोटो हाती लागल्याने त्यांच्यावर याप्रकरणी आणखी गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोपी गाडेच्या ओळखीचा एक व्यक्ती पिंपरी-चिंचवड परिसरात पोलीस दलात आहे. गाडे याने त्या व्यक्तीचा गणवेश अंगावर परिधान करून फोटो काढल्याची प्राथमिक माहिती आहे.

दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून शिरुर परिसरात तो एका लॉजबाहेर बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढत असल्याचे तपासात आढळले आहे. विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा. त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, अशी माहिती सुत्रांनी दिली.

आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी नको म्हणून अनेक महिला गाडे याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गाडे यांचा असे गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता. शिरुर परिसरातील लॉजच्या बाहेर बसून तो विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांना हेरायचा, अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील पीडीतेनं पोलिसांना दिलेला जबाबात गाडे याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे मी त्याला घाबरुन मला मारु नको, अशी विनंती केली होती, असे पीडितेने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटलं आहे. पोलिसांनी गाडे विरुद्ध पुरावे जमा करण्याचे काम सुरु केले आहे. शिवशाही बस फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे. गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com