मृत्यूपत्राची नोंद करण्यासाठी 50 हजार मागितले अन् 30 हजार घेताना तलाठी अडकला जाळ्यात

लाचखोर तलाठ्याचे नाव मारुती अंकुश पवार असून, तो चऱ्होली बुद्रूक सज्जाचा तलाठी आहे.
Bribery
BriberyFile Photo
Published on
Updated on

पिंपरी : मृत्यूपत्राची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठीही तलाठ्याने (Talathi) पन्नास हजार रुपये लाच मागून तीस हजार घेतल्याची धक्कादायक घटना आज (ता.२७) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) घडली. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार चऱ्होली बुद्रूक (ता.हवेली,जि.पुणे) येथे घडला. तेथील तलाठी कार्यालयातच ही लाच घेण्यात आली.

Bribery
राज्यात मंत्रिपद मिळालेले माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, राजकारणात प्रमोशन, डिमोशन काही नसतं!

मारुती अंकुश पवार (वय ४१) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तो चऱ्होली बुद्रूक सज्जाचा तलाठी आहे. या घटनेतील तक्रारदार हे मृत्यूपत्र व हक्कसोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यासाठी या तलाठ्याने पन्नास हजार रुपयांची मागणी केली. नंतर, तीस हजार रुपयांवर तडजोड करून ती आपल्या कार्यालयातच त्याने ती आज घेतली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. त्यांच्या तक्रारीवरून दिघी पोलिस ठाण्यात पवारविरु्ध्द लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या उपअधीक्षक विजयमाला पवार याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Bribery
लाखाला हजार-पाचशे घेण्यात गैर नाही! आमदारांनीच कर्मचाऱ्यांना दिले लाचखोरीचे धडे

दरम्यान, या तलाठ्याने लाच मागताच तक्रारदारांनी एसीबीकडे धाव घेतली. त्यांनी २३ व २४ सप्टेंबर असे दोन दिवस या तक्रारीची शहानिशा केली. त्यात खात्री झाल्याने आज सापळा रचून पवार याला पकडण्यात आले. दरम्यान, अशी कोणी लाच मागितल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर वा ०२०-२६१२२१३४ या दूरध्वनीवर संपर्क साधू शकता,असे आवाहन पुणे एसीबीचे वायएसपी उपअधीक्षक (डीवायएसपी) श्रीहरी पाटील यांनी केले आहे. एसीबीचे फेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACB अथवा ई-मेल आयडी : dyspacbpune@mahapolice.com तसेच, संकेतस्थळ www.maharashtra.gov.in येथेही संपर्क करू शकता, असे आवाहन पुणे एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com