Talawade Fire Accident : तळवडे जळीतकांडात मोठी अपडेट; चार कारखाना मालकांवर गुन्हा, पण...

Pimpri Chinchwad Talawade Fire Accident Death Toll Reaches Eight : तळवडे येथील घटनेनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे...
Pimpri Chinchwad Fire
Pimpri Chinchwad FireSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Latest News : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये तळवडे येथील एका बेकायदेशीर कारखान्यात शुक्रवारी (ता. ८) दुपारी स्फोट होऊन लागलेल्या आगीत आठ निष्पाप महिला कामगार होरपळून आणि गुदमरून मृत्युमुखी पडल्या. त्यांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्या या अनधिकृत कारखान्याच्या चार मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यात दोन महिला आहेत.

या दुर्घटनेत आठ महिला कामगार गंभीर जखमी झाल्या असून, त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये बर्निंग वॉर्ड नसल्याने पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची मोठ्या प्रयत्नानंतर ओळख पटविण्यात यश आले. याबाबत देहूरोड पोलिसांनी स्फोट होऊन नंतर आग लागलेल्या आणि स्पार्कल मेणबत्या बनविण्यात येणाऱ्या सदर कारखान्याच्या चार मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. त्यात दोन महिला आहेत, हे विशेष. नझीर अमीर शिकलगार (रा. मोहननगर, चिंचवड) या एका मालक भागीदाराला त्यांनी अटक केली आहे. शरद सुतार असे दुसऱ्या भागीदाराचे नाव आहे.

Pimpri Chinchwad Fire
Pimpri Chinchwad Fire : 7 निष्पाप महिला कामगारांचे बळी घेणारा कारखाना होता अनधिकृत

तळवडेतील रेड झोनमध्ये शिवराज एंटरप्रायजेस या नावाने हा स्पार्कल मेणबत्ती बनविण्याचा उद्योग बेकायदेशीरपणे सुरू होता. त्यासाठी कसलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच त्याकरिता ज्वालाग्राही स्फोटक रसायनांचा विनापरवाना वापर करण्यात येत होता. ते हाताळण्याकरिता कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपायही मालकाने केले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

स्फोट होऊन आग लागलेल्या कारखान्याला जागा भाड्याने देणारा जागामालक तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) पिंपरी-चिंचवड अध्यक्ष तुषार कामठे यांनी पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासकांकडे केली आहे. पिंपरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आशीवार्दाने असे अनधिकृत कारखाने चालविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

स्फोट झाला तशी अनेक अनधिकृत शेड त्या भागात असून त्याला स्थानिक राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याचा खळबळजनक आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केला. या नेत्यांवर कारवाई करावी तसेच या अनधिकृत उद्योगांची पाहणी करावी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कालच्या घटनेस जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली आहे.

Edited by sachin fulpagare

Pimpri Chinchwad Fire
Pimpri Chinwad : मोठी बातमी! तळवडेत फटाका गोदामाला आग; 6 जणांचा होरपळून मृत्यू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com