Talegaon Dabhade News: गड बिनविरोध! आता 'सिंहा' साठी झुंज; भेगडे -दाभाडेंचा कस लागणार

Talegaon Dabhade election 2025 News update: फॉर्म्युल्यानुसार, पहिली अडीच वर्षे नगराध्यक्षपद भाजपकडे आणि पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे; तर जागावाटपात भाजपला ११ आणि राष्ट्रवादीला १७ जागा देण्यात आल्या. दोन्ही पक्षांनी रडतखडत आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करत तब्बल १९ जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले.
Talegaon Dabhade election 2025 News update
Talegaon Dabhade election 2025 News updateSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

Talegaon Dabhade election 2025 News update: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे दोन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी एकमेकांना टाळी देत युतीचा प्रस्ताव मांडला. महायुतीने 19 नगरसेवक बिनविरोध आपला 'गड'सुरक्षित केला आहे, पण 'सिंहा'साठी आता झुंजावे लागणार आहे.

तळेगाव शहरात भेगडे आणि दाभाडे ही दोन मोठी घराणी प्रभावी आहेत. नातीगोती आणि अंतर्गत समीकरणे मोठी असल्याने निवडणुकीत ‘घराण्यांची राजकीय ताकद’ निर्णायक ठरणार, अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी एका कार्यक्रमात भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना “मी हात पुढे केला आहे, आता टाळी द्यायची की नाही हे मामांनी ठरवावे.” असा प्रस्ताव ठेवला होता. त्याला प्रत्युत्तर देत भेगडे यांनी “टाळी मी देतो, पण युती फक्त तळेगावपुरती नको; वडगाव, लोणावळा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलाही करूया.” असे सांगितले.

यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. शेवटी फक्त तळेगाव नगरपरिषदेसाठीच महायुतीचा फॉर्म्युला अंतिम झाला. या युतीसाठी भाजपचे गणेश भेगडे, इंदरमल ओसवाल तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि सुधाकर शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

फॉर्म्युल्यानुसार, पहिली अडीच वर्षे नगराध्यक्षपद भाजपकडे आणि पुढील अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे; तर जागावाटपात भाजपला ११ आणि राष्ट्रवादीला १७ जागा देण्यात आल्या. दोन्ही पक्षांनी रडतखडत आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करत तब्बल १९ जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले.

Talegaon Dabhade election 2025 News update
Nashik APMC : अजित पवारांच्या माजी खासदाराचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप; बाजार समितीचे दिवाळी काढले?

निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

अर्ज प्रक्रियेदरम्यान ज्यांना अर्ज मागे घ्यायला लावले, त्यातील काहींना अडीच वर्षानंतर नगरसेवक करण्याचे आश्वासन देण्यात आले, तर काहींना ‘स्विकृत नगरसेवक’ करण्याचे लेखी हमीपत्र देण्यात आले. त्यामुळे दोन्ही पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि चर्चांना उधाण आले आहे.

तोडगा काढू शकले असते...

विधानसभा निवडणुकीनंतर बापूसाहेब भेगडे समर्थक किशोर भेगडे, उद्योजक रामदास काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या नव्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीसोबत युती करण्यास ठाम विरोध होता. त्यातूनच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागण्याची ही मोठी कारणे समोर आली.

भाजपमधील उमेदवारी नाकारलेल्या काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून अजिबात माघार घेतली नाही. दोन्ही पक्षांचे नवे व जुने नेते एकत्र बसून तोडगा काढू शकले असते, तर तळेगाव दाभाडे नगरपरिषद पूर्णपणे बिनविरोध झाल्याचे चित्र दिसले असते, अशी चर्चा राजकीय पातळीवर जोरात आहे.

नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत

  • संतोष हरिभाऊ दाभाडे — महायुती

  • किशोर छबुराव भेगडे — भाजप

  • रंजना भोसले-अपक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com