राष्ट्रवादीचे दहा-बारा आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात...

Uday Samant : उदय सामंत हे प्रथमच पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज आले होते.
Uday Samant Latest News
Uday Samant Latest NewsSarkarnama

पिंपरी : उद्योगमंत्री झाल्यानंतर उदय सामंत हे प्रथमच पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज (ता.१९ ऑक्टोबर) आले होते. तळेगाव आणि चाकण येथे त्यांनी तेथील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत बैठका घेतल्या.

त्यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, बारा आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा पुनरुच्चार केला. याव्दारे शिवसेना फोडल्यानंतर आता राष्ट्रवादीतही फूट पाडण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Uday Samant Latest News)

तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयातील आढावा बैठकीनंतर सामंत बोलत होते. त्यानंतर त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत कोर्टयार्ड मेरियेट, चाकण येथे बैठक घेतली. उद्योगांना होणारा सर्व प्रकारचा त्रास मुळासकट उखडून टाकण्याची मोहीम सुरु केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

त्याचवेळी उद्योगांनीही स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निर्भय उद्योग ही संकल्पना घेऊन पुढे जाणार आहे,असे ते म्हणाले. हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमध्ये आता जागाच उपलब्ध नसल्याने तळेगाव औद्योगिक परिसरात ती आयटी उद्योगांना देण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी तळेगावात सांगितले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील (शिंदे गट) मंत्री वा आमदार नाराज असल्याचा त्यांनी यावेळी इन्कार केला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत वाद असल्याची अफवा आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

खोक्यांचा आरोप केलेले ही अफवा उठवीत आहेत, असे ते म्हणाले. चांगल्याला चांगले म्हणावे, उगीच डिवचू नये, या अजित पवार, तर चांगलं होत असेल, तर त्यात नाहक टिपण्णी करू नये, या शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचे सामंत (Uday Samant) यांनी यावेळी तोंडभरून कौतूक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com