Pune Municipal Corporation: अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांचा ठेंगा; पाच उपायुक्तांचा पगारवाढ रोखणार?

Pune News: पुणे शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल आॅडिट करून अहवाल सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अधिकृत होर्डिंगचा विषय चांगलाच चर्चात आला आहे. मध्यंतरी तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अधिकृत होर्डिंगमुळे काहींना जीव गमवावा लागला. मात्र, यानंतर प्रशासन चांगलच अलर्ट झालं होतं.

यानंतर पुणे शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची तपासणी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश परिमंडळाच्या उपायुक्तांना अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले होते.

पण हा आदेश देऊन दोन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला तरीही संपूर्ण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता पाच उपायुक्तांना तुमची पगारवाढ आणि पदोन्नती का रोखू नये, अशी नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच झटका बसण्याची शक्यता आहे.

Pune Municipal Corporation
Devendra Fadnavis News: फडणवीसांकडून पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन ? 'महाभारता'चा दाखल देत म्हणाले...

किवळे येथे १७ एप्रिल रोजी अनधिकृत होर्डिंग कोसळून त्यात काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे शहरातील अधिकृत, अनधिकृत अशा तब्बल ३ हजार ९०० होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. यामुळे महापालिकेने अधिकृत होर्डिंग व्यावसायिकांनी त्यांचे होर्डिंग सुरक्षीत आहेत की, नाही याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचेही आदेश दिले होते.

तसेच व्यावसायिकांनी त्यांचे होर्डिंग सुरक्षीत आहेत की, नाही याची तपासणी करण्याचेही सांगितली होती. अन्यथा होर्डिंग अनधिकृत ठरविले जाईल, अशा इशारा अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी लेखी आदेशाद्वारे दिला होता. त्यानंतर होर्डिंग व्यावसायिकांनी मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल ऑडिटरकडून होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल महापालिकेला सादर केला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune Municipal Corporation
Maharashtra politics : राज्यात काँग्रेसची ताकद वाढणार? विधानसभा अन् विधान परिषदेतील महत्त्वाच्या पदावर ठोकला दावा

दरम्यान, मात्र, सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून त्यांच्या हद्दीतील अनधिकृत आणि अधिकृत होर्डिंगची माहिती मागविली असता अनेक क्षेत्रीय कार्यालयांनी ही माहिती अद्याप सादर केलेली नाही. क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना याप्रकरणी नोटीस बजावून १ हजार रुपयांचा दंड केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

पण त्यानंतरही ही माहिती सादर न केल्याने परिमंडळ उपायुक्तांना नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतरही ही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आता पाच उपायुक्तांना थेट उपायुक्तांना पदोन्नती व वेतनवाढ का थांबवू नये, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच त्यांचा खुलासा आल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे कुणाल खेमनार यांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com