PCMC Andolan News : पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला उत्स्फूर्त पाठिंबा ; शिंदे शिवसेना वगळता सर्व पक्षांची मराठा आरक्षण सभेला हजेरी

Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या पुकारण्यात आलेल्या या बंदला दीडशे संघटनांनी पाठिंबा दिला होता.
PCMC Andolan News
PCMC Andolan NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि, जालना) येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता.९) उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. तसेच मोठा निषेध मोर्चा काढण्यात येऊन जंगी निषेध सभा घेण्यात आली. तिला सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी हजेरी लावली. अपवाद फक्त शिंदे शिवसेना (Shivsena) राहिली. त्यामुळे त्याची चर्चा झाली.

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या पुकारण्यात आलेल्या या बंदला दीडशे संघटनांनी पाठिंबा दिला होता. अगदी एमआयएम पक्षानेही हा बंदच नाही, तर मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तो ही चर्चेचा विषय ठरला. तर, शिंदे शिवसेनेचे कुणी दिसले नाही. त्यामुळे त्याचीही चर्चा झाली.

PCMC Andolan News
PCMC News : मराठा आरक्षण समर्थनार्थ 'MIM'च्या शहराध्यक्ष रुहीनाज शेख यांचे भाषण ठरले लक्षवेधी

पिंपरी चौकात ही सभा झाली. तिला शहरात शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंसह त्यांचे शहप्रमुख आले नाहीत. खासदार बारणे हे मुंबईतील बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. तर, भाजपचे (BJP) शहराध्यक्ष शंकर जगताप हे ही शहराबाहेरच होते. पण, माझा आणि माझ्या पक्षाचाही मराठा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी फोनवरून 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

राज्यातील सत्तेत सामील भाजपचे शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे, पक्षाचे पिंपरी-चिंचवडकर प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर प्रवक्ते विनायक रणसुंभे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, ठाकरे शिवसेनेचे पिंपरीचे माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, कॉंग्रेस (Congress) आणि मनसेचे शहराध्यक्ष अनुक्रमे डॉ. कैलास कदम आणि सचिन चिखले आदी सर्वपक्षीय नेत्यांनी पिंपरीतील सभेला हजेरी लावून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला.

PCMC Andolan News
Patole on Modi : दलित असल्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रण नाही, नानांचा स्फोटक आरोप !

मराठा म्हणून आणि पक्षाचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. तर, भाजपच्या एकनाथ पवार यांनी, तर मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी यावेळी दर्शवली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com