पुण्यात भाजपा-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातूनच सर्वाधिक हरकती-सूचना

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती सूचना नोंदविण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली.
NCP-BJP
NCP-BJPSarkarnama
Published on
Updated on

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेवर नाराजी असल्याची चर्चा सुरू असताना त्याचे प्रत्यंतर हरकती सूचनांमधून दिसून आले आहे. आज (ता.१४) शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ३ हजार ५९६ हरकती-सूचनांची नोंद निवडणूक शाखेकडे झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार हरकती या वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांनी तब्बल १ हजार ३४ नोंदविल्या आहेत. तर शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत केवळ १२ हरकती-सूचना आल्या आहेत.विशेष म्हणजे भाजपा व राष्ट्रवादी (bjp And ncp) या दोन्ही पक्षांच्या बालेकिल्ल्यांतून सर्वाधिक हरकती आल्या आहेत.

NCP-BJP
पुणे पालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष ठरणार ‘श्रीयाळशेठ’?

निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली आहे.प्रभागरचना सोईची व्हावी यासाठी महापालिकेतील राजकीय पक्षांनी फिल्डींग लावली होती. निवडणूक आयोगाने एक फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभागरचना जाहीर केल्यानंतर मात्र, त्यात विचित्र पद्धतीने प्रभाग केल्याचे समोर आले. नैसर्गिक नाले, ओढे, मोठे रस्ते, चौक यांचे नियमांचे पालन केले नाही, लहान गल्लीबोळातील रस्त्यावरून प्रभागांची सीमा ठरवली आहे. त्यामुळे वस्ती, सोसायट्या दोन प्रभागात विभागले गेले आहेत. काहींचे प्रभाग छोटे तर काहींचे प्रभाग १० ते ३६ चौरस किलोमीटर लांबीचे झाले आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांनी नकाशानुसार प्रभाग फिरून पाहिला. नेमका कोणता भाग कसा तोडला आहे, कोणता भाग जोडला आहे याचा अभ्यास केला, त्यामुळे हरकती सूचनांची मुदत सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यात बोटावर मोजण्या इतक्या हरकती सूचना आल्या होत्या. प्रभाग फिरून झाल्यानंतर इच्छुकांची व कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात हरकती नोंदविल्या आहेत.

NCP-BJP
काहींच्या विरोधामुळे पुणे पालिकेत फुलेंच्या पुतळ्यासाठी ४४ वर्षे वाट पाहावी लागली

‘‘प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती सूचना नोंदविण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली. त्यामध्ये निवडणूक शाखेकडे महापालिकेकडे ३ हजार ५९६ हरकती व सूचना आलेल्या आहेत, त्यापैकी २ हजार ८०४ हरकती सूचना शेवटच्या दिवशी आलेल्या आहेत. १६ फेब्रुवारी रोजी हरकती सूचनांचे विवरण निवडणूक आयोगाला सादर केले जाईल, अशी माहिती निवडणूक शाखेचे उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.

२०१७ च्या तुलनेत तिप्पट हरकती

पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग झाला होता, त्यावेळी प्रभाग रचना काही ठरावीक राजकीय पक्षांच्या सोईची करून घेतली असा आरोप झाला होता. तरीही सुमारे ११०० हरकती सूचना आल्या होत्या. यंदाही राजकीय हस्तक्षेप झाल्याचा व चुकीच्या पद्धतीने प्रभाग केल्याचा आरोप झाला, पण त्यानुसार हरकती व सूचनांची संख्याही वाढलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या हडपसर, वडगावशेरी, येवलेवाडी-कोंढवा यासह भाजपचे प्राबल्य असलेल्या कसबा-विश्रामबाग, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातून जास्त हरकती आलेल्या आहेत.

क्षेत्रिय कार्यालयनिहाय-हरकती-सूचनांची संख्या

औध-बाणेर - ३५

भवानी पेठे - २३

बिबवेवाडी - ६८

धनकवडी -सहकारनगर- २८९

ढोले पाटील रस्ता - ११३

हडपसर-मुंढवा - ८८

कसबा -विश्रामबाग - २५३

कोंढवा -येवलेवाडी ५१

कोथरूड -बावधन - ७७

नगर रस्ता -वडगावशेरी १५६

शिवाजीनगर -घोले रस्ता १२

सिंहगड रस्ता - २५

वानवडी -रामटेकडी -१०३४

वारजे -कर्वेनगर -६२

येरवडा-कळस-धानोरी - १५

निवडणूक कार्यालय - १२९५

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com