धक्कादायक : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरमधील घटना
Dashrath Kedari
Dashrath Kedarisarkarnama
Published on
Updated on

जुन्नर : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या (Farmer) आत्महत्या वाढत आहेत. त्यातच पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरमध्ये (Junnar) एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

फायनान्सवाले दमदाटी करतात, पतसंस्थावाले अपशब्द वापरतात, अशी चिठ्ठी या शेतकऱ्यांने लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरातील रानमळा येथे ही घटना घडली.

Dashrath Kedari
मुख्यमंत्री छा जा रहे है; राज्यपालांची एकनाथ शिंदेंवर स्तुती सुमने

दशरथ लक्ष्मण केदारी या अल्पभूधारक शेतकऱ्यांने शनिवारी आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणा व शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केदारी यांनी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळत नाही. याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.

Dashrath Kedari
शिंदे गटाचा भाजपलाच धक्का; पक्षातील अनेक पदाधिकारी फोडले

पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे म्हणत शेवटी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रिजर्व बॅक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागीरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com