Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या सोडतीत माजी नगरसेविकालाच लागली 'लॉटरी'! मिळाले 'हे' बक्षीस

Pune Political News : यंदा पालिकेने करदात्यांसाठी 'प्रोत्साहन' योजनाही जाहीर केली होती.
PMC Pune News
PMC Pune NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिकेने नागरिकांनी मिळकत कर मुदतीत भरावा, यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात प्रोत्साहन योजनेची घोषणा केली होती. तसेच विजेत्यांसाठी विविध बक्षीसे जाहीर करण्यात आली होती. मुदतीत कर भरणाऱ्या नागरिकांमधून लॉटरी पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात येणार होती. आता या योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या सोडतीत माजी नगरसेविकेला लॉटरी लागली आहे.

महानगरपालिका दरवर्षी ३१ मेपर्यंत मिळकत कराची रक्कम भरणाऱ्या करदात्यांना पाच ते दहा टक्के सवलत देते. मात्र, यंदा पालिकेने करदात्यांसाठी 'प्रोत्साहन' योजनाही जाहीर केली होती. त्यात चाळीस टक्के सवलतीच्या विषयावरून वाद निर्माण झाल्याने त्यावर निर्णय घेण्यास राज्य सरकारला विलंब झाला.

PMC Pune News
Adhalrao Patil On Amol Kolhe: खासदार झालो म्हणजे मोठा झालो, चाललो शुटिंगला; आढळराव-पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

त्यामुळे महापालिकेने मिळकत कराचे बिल भरण्याची ३१ मुदत जुलैपर्यंत वाढविली होती. या मुदतीत सात लाख ६२ हजार ५३९ नागरिकांनी बिलाचा भरणा केला होता. त्यातून माजी नगरसेविका ज्योती कळमकर(Jyoti Kalamkar) यांच्या नावाची चिठ्ठी सोडतीत निघाली. त्यांच्यासह चार पुणेकर नशीबवान ठरले आहेत.

पुणे महापालिके(PMC)ने नागरिकांनी मिळकत कर मुदतीत भरावा, यासाठी पुणे महापालिकेने राबविलेल्या‘प्रोत्साहन योजने’त सात लाखांहून अधिक नागरिकांमधून माजी नगरसेविका ज्योती कळमकर या नशीबवान ठरल्या. या योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या सोडतीत कळमकर यांना चारचाकी मिळाली आहे.

PMC Pune News
Walse Patil Challenge : आम्हाला आलेली ईडीची नोटीस घेऊन या, लगेच आमदारकीचा राजीनामा देतो; वळसे पाटलांचे चॅलेंज

पालकमंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्या हस्ते रविवारी सोडत काढण्यात आली. त्यात भाजपच्या माजी नगरसेविका कळमकर या नशीबवान ठरल्या. त्यांच्यासह दीपाली व दर्शन ठाकूर, प्रियंका पोखरकर, माणिक ज्ञानोबा ढोणे आणि आदित्य कुमार हे देखील विजेते ठरले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com