निवडणूक जवळ आली अन पाणीप्रश्नाची जाणीव झाली

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायीच्या सभागृहात पाणीप्रश्नावर सत्ताधाऱ्यांचीच प्रशासनावर टीकेची धार
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Published on
Updated on

पिंपरी : बुधवारी (ता.१) रात्री उशीरापर्यंत सलग १८ तास अवकाळी पावसाची संततधार सुरु होती. तर, त्याचवेळी दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीच्या बैठकीत पाणीप्रश्नावरून घमासान चर्चा सुरु होती. सत्ताधारी भाजप सदस्यांनीच प्रशासनाला शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून धारेवर धरले होते.

गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण भरूनही शहरात पाण्याची समस्या भेडसावते आहे. दोन वर्षापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र,त्याची जाणीव सत्ताधाऱ्यांना काल (ता.१) झाली. कारण अडीच महिन्यावर पालिका निवडणूक आल्याने त्यांना या प्रश्नाची जाणीव आता झाल्याची चर्चा या बैठकीनंतर पालिकेत ऐकायला मिळाली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Omicron मुळे महाराष्ट्राच्या मनातली धडधड वाढली, राजेश टोपे म्हणाले...

दरम्यान, १ नोव्हेंबरपासून शहरातील पाणीपुरवठा नियमित केला जाईल. म्हणजे दररोज पाणी दिले जाईल,हे सत्ताधाऱ्यांनी दिलेले आश्वासनही गाजर ठरल्य़ाचे स्पष्ट झाले.कारण १ नोव्हेंबरच नाही,तर १ डिसेंबर होऊनही शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा कायमच राहिला आहे.तसेच तो या टर्ममध्ये,तरी पूर्ववत होण्याची शक्यता नसल्याचे स्थायीतील सत्ताधारी सदस्यानेच गुरुवारी सरकारनामाला सांगितले. म्हणजे यापुढेही काही महिने दिवसाआड पाण्याला म्हणजे कमी दाबाने मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्याचा सामना पिंपरी-चिंचवडकरांना धरण भरले असतानाही करावा लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यानेही त्याला दुजोरा दिला. जोपर्यंत भामा-आसखेड वा आंद्रा धरणातून वाढीव पाणी आणले जात नाही,तोपर्यंत दररोज पाणी देणे अवघड आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे स्मार्ट सिटीचे काम झालेल्या व सुरु असलेल्या पिंपळे सौदागर या शहराच्या पॉश भागातही गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा सुरु आहे. तेथील भाजपचे नगरसेवक बापू काटे यांनी या प्रश्नाला काल स्थायी बैठकीत प्रथम वाचा फोडली. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांमुळे ही कृत्रिम पाणीटंचाई सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रश्नी अधिकारी गंभीर नसून ते ऐकत नाही, हलगर्जीपणा करतात,अशी तक्रार त्यांनी केली.

त्यानंतर काळेवाडीतील भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीच्या सदस्य नीता पाडाळे यांनीही आपल्या प्रभागात हाच प्रश्न भेडसावत असल्याचे सांगितले. एवढेच नाही,तर कमी दाबाने अपुरा आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासनाने शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी तांत्रिक कारण पुढे केले. त्यावर समाधान न झालेल्या स्थायी समिती सभापती आणि अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ताबडतोब निर्णय घ्या,असे प्रशासनास बजावले.

मागील पंधरा दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यावर त्वरित निर्णय घेऊन पूर्ण दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करावा,असा आदेश त्यांनी आयुक्तांना दिला. दरम्यान, पावणेसात कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावांना या बैठकीत स्थायीने मंजूरी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com