Rahul Gandhi News: राहुल गांधींविरुद्धचा निकाल भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग; काँग्रेसचा आरोप

Pune Congress : सुरत न्यायालयाच्या निकालावरून मोहन जोशींनी घेतला केंद्र सरकारचा समाचार
Pune Congress Agitation
Pune Congress AgitationSarkarnama

Surat Court : देशभरात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा प्रभाव वाढत आहे. त्यातून आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सरकार सत्तेवरून फेकले जाणार आहे. याची कल्पना आल्यानेच खासदार राहुल गांधींवर विविध आरोप केले जात आहेत. खटले दाखल करून त्यांना लोकसभेतून अपात्र करण्याचे षडयंत्र मोदी सरकार व भाजपने रचले आहे. सुरत सत्र न्यायाल्याचा निकाल हा त्यातीलच एक भाग आहे. मात्र, यामुळे आता देशातील काँग्रेस कार्यकर्ते पेटून उठले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातून मोदी सरकारला काँग्रेस निश्चित पराभूत करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी केले आहे.

Pune Congress Agitation
Devendra Fadanvis News : लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्याच्या विचाराधीन..

मोहन जोशी (Mohan Joshi) म्हणाले की, "कर्नाटकातील कोलार येथे २३ एप्रिल २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत जाहीरसभेत केलेल्या भाषणात ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आडनाव कॉमन का आहे? सर्व चोरांचे नाव मोदी का असते?’ अशी टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. या टीकेमुळे गुजरातमधील मोदी समाजाची मानहानी झाली असे सांगून दाखल गांधींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल म्हणजे भाजपचा राजकीय विशाल षडयंत्राचा भाग आहे."

Pune Congress Agitation
Amol Mitkari News : मंत्रालयातील कॅन्टीन चालकांवर गुन्हे दाखल; विनापरवाना ठेवत होते खाद्य पदार्थ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप (BJP) म्हणजे भारत देश नाही, असे असूनही लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेली टीका म्हणजे भारतविरोधी बाब आहे, असे सांगत भाजपने गेल्या आठवड्यात संसदेचे कामकाज बंद पाडले, हा देखील त्या षडयंत्राचा भाग असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.

जोशी म्हणाले, "भारत जोडो यात्रेनंतर साऱ्या देशात बदलेल्या वातावरणामुळे मोदी सरकार व भाजपला धडकी भरली आहे. त्यातच प्रचंड महगाई, बेकारी आणि अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा यामुळे देशातील जनात मोदी सरकारवर संतप्त झालेली आहे. त्यातून २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होणार असल्याची प्रचिती भाजपला जागोजागी येऊ लागली आहे. पुण्यातील कसबा विधानसभा निवडणूक ही त्याचेच एक उदाहण आहे."

Pune Congress Agitation
Kolhapur : हसन मुश्रीफांविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल

देशातील मोदी सरकारविरुद्धच्या असंतोषाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) करीत आहेत. त्यामुळे त्यांना विविध खटल्यांमध्ये अडकवणे, त्यांची प्रतिमा डागाळणे असे प्रकार भाजपने सुरू केले आहेत. सुरत सत्र न्यायाल्याने शिक्षा दिल्याच्या नावाखाली लोकसभा अध्यक्षांमार्फत राहुल गांधींना अपात्र करणे, हे मोठे षडयंत्र भाजपने रचल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.

मोहन जोशी म्हणाले की, "भाजपच्या अशा कारवायांपुढे काँग्रेस (COngress) पक्ष झुकणार नाही. लोकशाहीतील निवडणूक आयोग सत्र न्यायालय यांच्यावर दडपण आणून स्वतःला हवे तसे निर्णय लाऊन घेतले जातात. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदाणी प्रेम उघड झाल्यामुळे ते आणि त्यांचा भाजपा पक्ष घायकुतीला आला आहे. खासदार गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राचा मुकाबला करण्यासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com