Devendra Fadnavis : ''...तर कसब्याप्रमाणेच नागपूरमध्ये फडणवीसांचा पराभव शक्य!''; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान

Kasba By Election : कुठलाही उमेदवार दिला तरी तो फडणवीसांच्या विरोधात निवडून येईल...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Ashish Deshmukh News : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंना धोबीपछाड दिला आहे. तब्बल ११ हजार मतांनी रासनेंना पराभवाची धूळ चारत धंगेकर हे भाजपच्या मतदारसंघात 'बाजीगर' ठरले आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी भाजपावर टीकास्त्र सोडले जात आहे. आता कसब्याच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यानं भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. देशमुख म्हणाले,कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी मतदार उभे राहिले. त्याच पद्धतीनं दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये 2019 मध्ये अगदी कमी कालावधीतही मतदार माझ्या पाठीशी उभे राहिले होते.

Devendra Fadnavis
Chinchwad By Election Result : ...म्हणून तर निवडणुकीत पैशांचा वापर; काटेंनी स्पष्टच सांगितलं कारण

आज कसबाचा निकाल भाजपच्या विरोधात येताच आशिष देशमुख यांनी कसबा पेठ आणि दक्षिण पश्चिमच नागपूर या दोन्ही मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीत सारखीच आहे. तसेच, दक्षिण, पश्चिम नागपूरमध्ये महाविकास आघाडीची एकी असल्यास देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचा पराभव शक्य असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी मतदार उभे राहिले. त्याच पद्धतीनं दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये 2019 मध्ये अगदी कमी कालावधीतही मतदार माझ्या पाठीशी उभे राहिले होते, असं वक्तव्य देखील आशिष देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतानाही 2014 च्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांचं मताधिक्य कमी करु शकलो असंही आशिष देशमुख म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis
Kasba by-election News :...तर रवींद्र धंगेकर आज भाजपचे आमदार असते!

ज्या पद्धतीने नागपुरात शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ आणि इतर निवडणुकांमध्ये सातत्याने काँग्रेसचा महविकास आघाडीचा विजय होत आहे. त्याच ताकदीने एकत्रितपणे लढल्यावर पुढील निवडणुकीत नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातही महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल. कुठलाही उमेदवार दिला तरी तो निवडून येईल असा दावाही आशिष देशमुख यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com