...ही तर जनतेसाठी महात्रासाची दोन वर्षे !

अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे.
मुकुंद किर्दत
मुकुंद किर्दत सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोरोना चे अभूतपूर्व संकट आल्यापासून जनता पूर्ण पिचून निघाली आहे. त्यातच अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचा महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे. समजूतदार कुटुंब प्रमुखाची भाषा बोलत जनतेला सहन करण्याचे आवाहन करणारे मुख्यमंत्री आणि तिघाडी सरकारने जनतेचे रोजगार,कोरोना उपचार,शैक्षणिक शुल्काचा तगादा, वीजबिल सवलत,महागाई, गृहखात्याचे अपयश,महिला अत्याचार या सर्वच आघाडीवर निष्क्रिय ठरले असल्याने जनतेसाठी महाविकास आघाडी महात्रासाची ठरली आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

मुकुंद किर्दत
चाकणकरांनी चांगलं काम करावं; सत्तेतल्या रावणांना पाठीशी घालू नये

किर्दत म्हणाले, ‘‘ गेल्या दोन वर्षातील जनतेच्या अपेक्षांची यादी मोठी आहे.घरकामगार,रिक्षा चालक असो किंवा विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा असंघटीत क्षेत्रातील कामगार,लघु उद्योजक या सर्वांच्या वाट्याला अत्यंत कठीण काळ आला आहे.अजूनही आर्थिक चक्र व्यवस्थित सुरु झाले नाही.अशावेळी लोकसंख्येच्या आर्थिक स्थरातील खालच्या गटाला आर्थिक मदत देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.

मुकुंद किर्दत
वाबळेवाडीचे ५२१ विद्यार्थी यापुढे शाळेत जाणार नाहीत : लवकरच आझाद मैदानावरही मोर्चा

राज्यातील ३५ लाख घर कामगार महिलांपैकी एक लाख महिलांनादेखील दीड हजार रुपयांची किरकोळ मदतही मिळू शकली नाही.इतर सर्व राज्यात खासगी शाळांनी शुल्क सवलत दिली.पण महाराष्ट्रात मात्र पालकांची सरकारने अक्षरश: चेष्टा केली.वीजबिल सवलतीबाबतचे 'यु टर्न' जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले.पेट्रोल,डिझल,गॅस भाववाढीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या टोलवाटोलवीमुळे जनतेला या जुगलबंदी वर हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे, अशी टीका किर्दत यांनी केली.

कोरोना काळात रुग्णाच्या लुटीचे आकडे या सरकारचे प्रशासकीय अपयशच दाखवते.अपयशाची ही यादी मोठी आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि नियत याचा अभाव असणाऱ्या या आघाडी सरकारच्या विरुद्धचा जनतेचा आवाज,शेतकरी आंदोलनातून,एसटी कामगारांच्या संपातून दिसून येतो आहे. त्यामुळे या आधीच्या ‘भाजपा सरकारच्या आगीतून महाविकास आघाडीच्या फुफाट्यात’ अशी जनतेची अवस्था झाली आहे, अशी टीका आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com