पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यातून आमच्यावर केलेली टीका समजू शकतो. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि त्यांच्या नातवावरची टीका खालच्या दर्जाची होती. आजपर्यंत आम्ही अनेक टीका पाहिल्या, पण, अशी टीका कुठे ऐकली नव्हती. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, त्यामुळं आम्ही दुखावलो गेलोय, असे अनेकजण दुखावले आहेत. अनेकजण नाराज होऊन निषेध करत आहेत, अशा शब्दांत कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरे यांच्या त्या विधानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. (This was not expected from Uddhav Thackeray: Shambhuraj Desai)
दसरा मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातवावर टीका केली होती. त्याबाबत देसाई यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
शंभूराज देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगापुढं काय दाखल झालं. मला माहिती नाही. मी या सर्व घडामोडीमध्ये शिंदेसाहेबांसोबत आहे. सर्व पदाधिकारी यांनी आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना नेते केले आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही. नेते म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांना निवडले आहे.
आमच्या सरकारला शंभर दिवस झाले. आमचे आणि उद्धवसाहेब यांच्या सरकारबद्दल तुम्हीच ठरवा. मी उद्धवसाहेब यांच्या मंत्रिमंडळ नामधारी होतो. आता चांगलं काम चाललं आहे. अनेक निर्णय केले आहेत. मुख्यमंत्री १८ तास काम करत आहेत. सगळे मंत्री झटून काम करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये आम्ही पक्षाचा आदेश म्हणून राहिलो. अडीच वर्षे सरकार चालवताना कळलं की हे सरकार राष्ट्रवादी चालवत आहे, अशी टीकाही त्यांनी मागच्या सरकारवर केली.
सामना म्हणजे महाराष्ट्र का? सोशल मीडिया कोणाला तरी डॅमेज करण्यासाठी असतात. मुख्यमंत्र्यांच्या भाषणं हे भाजपची स्क्रिप्ट वगैरे काही नव्हतं. कोणी काहीही बोलतं. मुख्यमंत्री दसरा मेळाव्यामध्ये वेगळे आणि विकासाचं बोलले, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.