Wrestlers Protest: ब्रिजभूषणवरील कारवाईसाठी पुण्यात अनोखं आंदोलन; एस.पी. कॉलेजच्या मैदानात होणार प्रतिकात्मक कुस्त्या

Wrestlers Protest in Delhi| दिल्लीतील जंतरमंतर मैदानात महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाची हाक दिली आहे.
Wrestlers Protest in Delhi|
Wrestlers Protest in Delhi| Sarkarnama

Wrestlers Protest in Jantar Mantar : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात महिला कुस्तीपटूंनी आंदोलनाची हाक दिली आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या १० दिवसांपासून महिला खेळाडू त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. (To take action against Brijbhushan, a symbolic wrestling match will be organized in the grounds of S.P. College in Pune.)

देशभरातून वेगवेगळ्या स्तरातून महिला खेळाडूंना पाठिंबा दिला जात असताना, आता पुण्यातून या महिला खेळाडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. दिल्लीतील शोषित महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात प्रतिकात्मक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे (Congress) संजय बालगुडे यांनी या प्रतिकात्मक कुस्त्यांचे आयोजन केलं आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानात उद्या (४ मे) सकाळी १० वाजता या प्रतिकात्मक कुस्त्या होणार आहेत.

Wrestlers Protest in Delhi|
IAS Officer : राजेशाही पदवीचा त्याग करून झाले 'आयएएस' अधिकारी, जाणून घ्या कोण आहेत ते राजपुत्र ?

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू केले. त्यांनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंना धमकावण्याचा आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. (Pune News)

यापूर्वी त्यांनी जानेवारीत आंदोलन केलं होतं. कुस्तीपटू विनेश फोगटने त्याच दिवशी 'महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केलं जात असल्याचा आरोप केला होता. मला स्वत: महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळाच्या 10-20 केसेस माहित आहेत. न्यायालय आम्हाला निर्देश देईल तेव्हा आम्ही पुरावे सादर करु. आम्ही पंतप्रधानांनाही पुरावे द्यायला तयार आहोत. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. इतकेच नव्हे तर, जो पर्यत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणताही खेळाडू कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही, अशी भूमिकाही विनेश घेतली होती. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com