NCP Meeting IN Pune : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला ; तिकीटावरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन..

Ajit Pawar News : अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.
Ajit Pawar News :
Ajit Pawar News : Sarkarnama

Ajit Pawar News : आगामी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बैठकांच्या सत्र सुरु झाले आहे. पुण्यात आज आठ लोकसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक सुरु आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीकडून लढवण्यात येत असलेल्या शिरुर, नगर दक्षिण, अमरावती यासारख्या मतदारसंघांचा यात आढावा घेतला जाणार आहे. या मतदारसंघातील पक्षाचे आजी, माजी आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि इच्छूक या बैठकीला उपस्थित आहेत.

Ajit Pawar News :
Hanumant Pawar Slams Sudhir Mungatiwar : पवारांचा एकेरी उल्लेख, मुनगंटीवारांवर काँग्रेस संतप्त ; 'सत्तेच्या मस्तीतून ..'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य नेतेही या बैठकीला उपस्थित आहेत.

विरोधीपक्ष अजित पवार यांनी आजच्या बैठकीत कार्यक्रर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. बैठकीत अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला. " उमेदवारीच्या तिकीटावरुन वाद नको, त्यावरुन भांडलात तर याद राखा..कानाखाली आवाज काढेल," अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं.

Ajit Pawar News :
Shivsena bjp Alliance : आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्याचं महत्वाचं टि्वट ; यापुढच्या काळात भाजपसोबत...

महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर मविआची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीची पुण्यात बैठक होत आहे.

Ajit Pawar News :
Odisha Train Tragedy : ओडिशा रेल्वे अपघातानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा ; घेतली 'ही' जबाबदारी

मागील काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरुर मतदारसंघाची चर्चा राज्यात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्याच विलास लांडे यांनी या लोकसभेच्या जागेवर दावा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक लोक इच्छुक आहेत, ही चांगली बाब आहे. शिरुर लोकसभा राष्ट्रवादी लढवणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com