आजचा वाढदिवस : साखर आयुक्त शेखर गायकवाड

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा आज वाढदिवस.
shekhar gaikwad.jpg
shekhar gaikwad.jpg
Published on
Updated on

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा आज वाढदिवस. १९८७ साली राज्य सेवेतून उपजिल्हाधिकारी झालेल्या झालेल्या गायकवाड यांनी राज्यात विविध ठिकाणी विविध पदावर काम करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.आधिकारी म्हणून काम करताना केवळ कामाचा भाग म्हणून त्याकडे न पाहता. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आणि त्यानुसार कार्यवाही ही त्यांची कामाची पद्धत आहे. (Today's birthday: Sugar Commissioner Shekhar Gaikwad )

गायकवाड हे मूळचे मलठण (ता. शिरूर) येथील आहेत. १९८७ साली परिक्षाविधीन आधिकारी म्हणून कोल्हापूरला कामाला सुरवात केल्यानंतर राज्यात सोलापूर, ठाणे, नाशिक येथे काम केले आहे. नाशिकला जिल्हाधिकारी तर मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव म्हणून महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. पुण्यात महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. कोरोनाच्या आधीच्या लाटेत पुण्यात यंत्रणा उभारण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. राज्याच्या सहकारक्षेत्राचे विशेषत: सहकारी साखर कारखानदारीचे महत्वाचे केंद्र असलेल्या साखर आयुक्त या पदावर गेल्या काही वर्षांपासून ते कार्यरत आहेत. या काळात ऊसाला आधारभूत किंमत नाकारणाऱ्या किंवा देण्यास उशीर करणाऱ्या अनेक कारखान्यांवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारताना कोणत्याही दबावाला बळी न पडता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहिले आहे. पाण्यापासून राज्यातील सहकारी साखर कारखानदारीपर्यंत चौफेर अभ्यास असलेल्या गायकवाड यांनी या विषयांवर सखोल अभ्यास करून पुस्तकेदेखील लिहिली आहेत. ‘महाराष्ट्राची भूजलगाथा’ या भूजलावरील मूलभूत पुस्तकाचे लेखन त्यांनी गेल्याच वर्षी पूर्ण केले आहे. केवळ आधिकारी म्हणून काम न करता प्रशासनातील पुढच्या पिढ्यांनाही उपयोगी व मार्गदर्शक असे गायकवाड यांचे काम आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com