Sarkarnama-Cricketnama : मुंडे, पटोले, विश्वजित, नार्वेकर भिडणार मैदानावर

सरकारनामातर्फे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
Sarkarnama-crikcetnama
Sarkarnama-crikcetnamasarkarnama
Published on
Updated on

पुणे : राजकीय पटलावर एकमेकांच्या विरोधात जोरदार फटकेबाजी करणारे राजकीय नेते आता थेट मैदानावर उतरून एकमेकांची विकेट घेणार आहेत. याला निमित्त ठरले आहे सरकारनामा क्रिकेटनामा स्पर्धेचे. (Sarkarnama-Cricketnama)

२०१७ पासून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या सकाळ माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' (Sarkarnama) वेबपोर्टलच्या वतीने येत्या २८ व २९ मे रोजी 'क्रिकेटनामा' या आगळ्या राजकीय-प्रशासकीय लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघांच्या जर्सीचे अनावरण आज पार पडले.

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांच्या संघाबरोबरच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे असे दोन संघही क्रिकेटच्या मैदानात आपले कसब दाखवणार आहेत.

पाषाण रोड, सूस येथील 'सनीज् वर्ल्ड'च्या मैदानात हे बाॅक्स क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. येत्या २८ व २९ मे रोजी दुपारी ४ ते रात्री १० या वेळात हे सामने खेळवले जाणार आहेत.

सरकारनामा, ई-सकाळ, साम टिव्ही या तिन्ही वेब पोर्टलच्या फेसबुक पेजवरून तसेच यु ट्यूब चॅनेलवरुन या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या संघात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आमदार आशुतोष काळे, अनिकेत तटकरे, सुनील टिंगरे हे आमदार खेळणार आहेत. काॅग्रेसच्या संघात विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, अमित झणक, संजय जगताप मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून प्रवीण खासदार सुजय विखे, आमदार गोपीचंद पडळकर, राम शिंदे, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, राम सातपुते आपले कसब दाखवणार आहेत.

Sarkarnama-crikcetnama
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

शिवसेनेकडून सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओम राजेनिंबाळकर, धैर्यशील माने, आमदार अंबादास दानवे, सचिन अहिर संघात असतील. मनसेकडून आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक नेते उतरणार आहेत. आयएएस संघाचे नेतृत्व पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयपीएस संघाचे नेतृत्व पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता करणार आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते स्पर्धेच उदघाटन होणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.

Sarkarnama-crikcetnama
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

या स्पर्धांच्या जर्सीचे अनावरण पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, आपचे प्रतिनिधी आबासाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे सागर बालवडकर यांच्या हस्ते झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com