43 IPS Transfer : पुण्यात गोयल, सांगलीला तेली, सोलापूरला सरदेशपांडे तर साताऱ्याला समीर शेख

आज बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला.
 Sameer Shaikh,Ankit Goyal & Shirish Sardeshpande , IPS Transfer Latest News
Sameer Shaikh,Ankit Goyal & Shirish Sardeshpande , IPS Transfer Latest NewsSDarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यीतील ४३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या पुण्याच्या ग्रामिण पोलीस अधिक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बसवराज तेली यांची सांगलीचे, शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूरचे आणि सातारचे पोलीस अधिक्षक म्हणून समीर शेख यांची नियुक्ती झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येंने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होती. मात्र अखेर आज बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला.

IPS Transfer News
IPS Transfer NewsSarkarnama
IPS TTransfer News
IPS TTransfer NewsSarkarnama

दरम्यान, राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यापैकी 24 जणांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. उर्वरित 19 अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या ठिकाणावरून बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. येत्या काही दिवसात या अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या नियुक्त्या सांगण्यात येतील असे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com