Pimpri-Chinchwad: पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची मुदतपूर्व बदली; विजयकुमार खोराटे नवे अतिरिक्त आयुक्त

Pimpri-Chinchwad Municipal Corporation: अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची राज्य शासनाने मुदतपूर्व बदली केली
PCMC Addl Commissioner Transfer
PCMC Addl Commissioner Transfer Sarkarnama

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (अप्पर जिल्हाधिकारी) जितेंद्र वाघ यांची आज उचलबांगडी करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना २१ सप्टेंबर २०२१ रोजी वाघ यांची पुणे मेट्रोच्या उपमहाव्यवस्थापक पदावरून पिंपरीत बदली करण्यात आली होती. पण, त्यांनी जवळजवळ दोन महिन्यानंतर म्हणजे १३ नोव्हेंबरला पदभार स्वीकारला होता.

प्रतिनियुक्तीवरील ही त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी होती. मात्र, दीड वर्षातच त्यांची मुदतपूर्व बदली झाली. त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात म्हणजे महसूल व वन खात्यात पाठविण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशात देण्यात आलेले नाही.

PCMC Addl Commissioner Transfer
Pune NCP : राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी दीपक मानकर; अजितदादांनी दिले नियुक्तीचे पत्र

त्यांच्या जागी सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त (मुख्याधिकारी गट अ श्रेणी) विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती केली गेली आहे. यापूर्वी पिंपरीत त्यांनी सहाय्यक आयुक्त (आकाशचिन्ह व परवाना विभाग, भुमी व जिंदगी विभाग), वर्धा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अमरावती महापालिकेत उपायुक्त आणि सोलापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com