Maharashtra Political news : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, उमेदवारांच्या प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याने वंचित बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार जाहीर केले आहेत, तर दोन ते तीन ठिकणचे उमेदवार बदलले आहेत.
महाविकास आघाडीत सहभागी होऊन वंचितने निवडणूक लढवावी, असा आग्रह महाविकास (MahaVikas) आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. यासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी वारंवार चर्चादेखील केली जात होती. मात्र, जागावाटप योग्य पद्धतीने होत नसल्याचे कारण पुढे करत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर करत काही ठिकाणी त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणादेखील केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपला (Bjp) सत्तेतून खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढविणे गरजेचे होते. मात्र, वंचितने स्वतंत्र उमेदवार देत चूक केली आहे. वंचित विकास ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याने महाविकास आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला असल्याचा आरोप गांधी यांनी केला. वंचित भाजपला मदत करत असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत वंचितला मतदान करू नका. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचे जाहीर आवाहन गांधी यांनी केले.
महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदारांना आवाहन करण्यासाठी तुषार गांधी यांनी प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राची स्थापना केली आहे. या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करा, महायुतीला मतदान करू नका, असे आवाहन केले जात असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले. अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक तसेच चित्रपट कलावंत यांचा प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्रच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे गांधी म्हणाले. राज्यातील विविध मतदारसंघांत फिरून महायुतीला मतदान न करण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. एमआयएम हीदेखील भाजपची दुसरी टीम असून, त्यांनादेखील मतदान न करण्याचे आवाहन गांधी यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन विकासाचे उमेदवार देऊन केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपची मदतच केली आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित बहुजन आणि एमआयएम काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपची बी टीम आहे. त्यांच्या विरोधात अधिकाधिक प्रचार करून त्यांना मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले जाणार असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे पणतू एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. निवडणुकीत मतविभाजन होऊ देऊ नका, असे आवाहन गांधी यांनी केले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.