Prakash Ambedkar News : मंडलिक, तुम्ही वर्तमानाबद्दल बोलत आहात की आणखी काही?

Sanjay Mandlik News : निवडणूक प्रचारादरम्यान संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. मंडलिक मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत.
Sanjay Mandlik, Shahu Maharaj, Prakash Ambedkar
Sanjay Mandlik, Shahu Maharaj, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. ते दत्तक आले आहेत, खरे वारसदार नाहीत, असे मंडलिक म्हणाले आहेत. त्यावरून आघाडीतील नेत्यांनी मंडलिकांवर निशाणा साधला आहे. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar News) यांनीही उडी घेतली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज एक्स हँडलवर मंडलिकांच्या वक्तव्यावर सूचक संकेत दिले आहेत. वंचितने कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना (Shahu Maharaj) यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता या वादात उडी घेत आंबेडकरांनी मंडलिकांना (Sanjay Mandlik) सवाल करत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Sanjay Mandlik, Shahu Maharaj, Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : भाजप-महाविकास आघाडीची 20 जागांवर मॅच फिक्सिंग; आंबेडकरांचे खळबळ उडवून देणारे आरोप!

काय म्हटलंय आंबेडकरांनी?

आंबेडकरांनी एक्स हँडलवर म्हटले आहे की, संजय सदाशिवराव मंडलिक, ते थेट वंशज नाही असे म्हणत असताना तुम्ही कोणाकडे इशारा करत आहात? त्याचे नाव सांगू शकाल का? तुम्ही वर्तमानाबद्दल बोलत आहात की आणखी काही?, असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते मंडलिक?

छत्रपतींच्या घराण्याचा आदर करतो; पण श्रीमंत शाहू छत्रपती ( Shahu Chhatrapati ) हे थेट वंशज नाहीत. ते दत्तकच आहेत. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. आधी त्यांनी आपण थेट वंशज आहोत, हे सिद्ध करावे. जर चुकीचं बोललो असतो तरच माफी मागेन," असे मंडलिक म्हणाले आहेत.

संजय मंडलिक यांनी एक पत्रक काढत दत्तक प्रकरण नेमकं काय? यावर भाष्य केलं आहे. माझे वक्तव्य कोल्हापूरची गादी अथवा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी नाही. विद्यमान शाहू महाराज हे दत्तक आलेले आहेत. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने 1963 मध्ये दत्तक वारस विरोधाला केलेल्या व्यापक जन आंदोलनाचा इतिहास आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

R

Sanjay Mandlik, Shahu Maharaj, Prakash Ambedkar
Shrikant Shinde News: बॉस वागतो तसे कार्यकर्त्यांना करावे लागते; श्रीकांत शिंदेंचा दरेकरांच्या आडून ठाकरे, राऊतांवर वार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com