धक्कादायक ! उद्योगनगरीत अल्पवयीन मुलांकडून पंधरवड्यात दोन खून

Pimpri-Chinchwad Crime | उद्योगनगरी पिंपरी- चिंचवडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
Pimpri-Chinchwad Crime
Pimpri-Chinchwad Crime
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad Crime news| पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी- चिंचवडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. धक्कादायक म्हणजे अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलांकडून सर्वाधिक गुन्हे घडत असल्याची बाब समोर आली आहे.

गेल्या महिन्यात ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बारा जणांच्या टोळक्यांनी एका सराईत गुंडाचा खून केला होता. यात तीन अल्पवयीन मुलांंचा समावेश होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या खुनातील चार मारेकरीही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या घटना पाहता शहरातील वाढत्या अल्पवयीन गुन्हेगारीचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Pimpri-Chinchwad Crime
बदली प्रक्रियेत घोळ : डीसीपींना बदलीनंतर 19 दिवसांनी नियुक्ती!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी (२५ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवन लष्करे या सराईत गुंडाचा बारा जणांच्या टोळक्याने कोयता आणि पालघनने सपासप वार करून निर्घूण खून केला होता. हल्लेखोरांत तीन अल्पवयीन मुले होती. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात काल (ता.६) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या खूनातील चार मारेकरीही अल्पवयीनच आहेत

आश्चर्याची बाब म्हणजे यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात या चार अल्पवयीन हल्लेखोर खूनी मुलांची नावे दिली आहेत. अशा गुन्हेगारांची नावे प्रसिद्ध केली जात नाहीत. एवढेच नाही,तर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सज्ञान महिलेचेही नाव न देण्याची खबरदारी घेतली जाते.तसेच कुठल्याच गुन्ह्यातील महिला फिर्यादीचे नाव सुद्धा शहर पोलिस देत नाहीत.मग, खूनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी पकडल्याच्या व त्यात चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतल्याच्या कामगिरीची प्रसिद्धी करताना,मात्र या सावधगिरीच्या प्रथेचा पोलिसांना विसर पडल्याने त्याची जोरात चर्चा सुरु झाली आहे.

Pimpri-Chinchwad Crime
बदली प्रक्रियेत घोळ : डीसीपींना बदलीनंतर 19 दिवसांनी नियुक्ती!

प्रणव ऊर्फ जय अनिल मांडेकर (वय १९, रा. इंदूरी,ता.मावळ,जि.पुणे) हा तरुण काल तळेगाव दाभाडे येथे हकनाक बळी गेला. कारण त्याचा मित्र विशाल वर्माची या खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मंगेश हिरे याच्याशी फोनवर वादावादी झाली होती. त्यातून मंगेश व त्याच्या सााथीदारांनी काल रात्री साडेनऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे कौस्तूभ खाडे या मित्रासह बोलत असलेल्या प्रणवचा पाठलाग करून त्याच्यावर कोयता व पालघनचे सपासप वार करून खून केला.खाडे हा तावडीत न सापडल्याने वाचला.हल्लेखोरांत चार अल्पवयीन मुले आहेत.

प्रणवचा खून करून पळून जाताना त्याच रात्री एका अल्पवयीन हल्लेखोर आरोपीने ध्रुव खिलारे या तरुणाच्या मानेवर कोयत्याने वार केला. पण, त्याने तो चुकविल्याने तो वाचला. ध्रुवचा मित्र मौसम शाहू हा या हल्लेखोर अल्पवयीन मुलाच्या मैत्रिणीशी फोनवरून बोलतो,तिला मेसेज करतो म्हणून निष्पाप ध्रुववर हा खूनी हल्ला या विधीसंघर्षित बालकाने केला,असे पोलिसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com