Uddhav Thackeray Slams Narayan Rane Over pro Refinery Rally news : माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज (शनिवारी) बारसू दौऱ्यावर आहेत. ते ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत.
ठाकरे आज बारसुत येणार असल्याने रिफायनरी समर्थक आणि विरोधक हे आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हानही दिलं आहे. त्यामुळे नारायण राणे आणि ठाकरे गटात वाद होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने 'सामना'मधून नारायण राणेंच्या विरोधात दंड थोपटले आहे. यावरुन आता राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत. "कोकणातील काही आंडूपाडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्या आहेत. पण आम्ही बारसूत जाणारच आहोत," असं ठाकरे गटाने 'सामना'तून सत्ताधाऱ्यांना ठणकावलं आहे.
"उद्धव ठाकरे यांनी बारसूत येऊनच दाखवावं. आम्हीही रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चे काढू," असं आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे. राणेंना ठाकरे गटानं प्रत्युत्तर दिले आहे. राणे यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.
कोकणात रात्री अपरात्री सायरन वाजवून लोकांची नाकेबंदी केली जात आहे. ही काय लोकशाही आहे काय? रिफायनरीला लोकांचा पाठिंबा आहे म्हणता तर मग एवढी दडपशाही कशाला? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.
"कोकणात पाय ठेवून दाखवा, इंगा दाखवतो वगैरे नेहमीच्या वल्गना केल्या गेल्या. या विषारी रिफायनरीच्या समर्थनार्थ हे इंगावाले मोर्चा काढणार आहेत. खोके हाताशी असले की भाडोत्री ताकद दाखवता येते, असा टोलाही अग्रलेखातून लगावला आहे.
काय म्हटलं आहे 'सामना'मध्ये..
पर्यावरणवाद्यांना मूर्ख ठरवायचे आणि बंदुकीचा वापर करायचा, असं सर्व सुरू आहे.
बारसू-सोलगावात सरकारी हुकूमशाहीने टोक गाठले आहे.
दिल्लीचे दडपशाहीचे जंतरमंतर बारसू-सोलगावातही अवतरले आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांनी हे दहशतीचे जंतरमंतर उद्ध्वस्त करायला हवे
अडीच वर्षात ठाकरे सरकारने कधीच बारसूत जोरजबरदस्ती केली नाही. दंडूकेशाही केली नाही.
रिफायनरी हवी की नको हे स्थानिकांना ठरवू द्या असंच ठाकरे सरकारचं म्हणणं होतं.
आताचे सरकार हे अरामको कंपनीचे लँडिंग एजंट असल्यासारखेच वागत आहेत.
रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकत आहे.
प्रकल्प नाकारायला बारसूतील लोकांना वेड लागलं नाही. त्यांच्या समोर माहुलचं उदाहरण आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.