सर्वोच्च न्यायालयात उद्या सरकारचा निर्णय होईल असे वाटत नाही!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुवावणी होणार आहे
Ujwal Nikam News
Ujwal Nikam NewsSarkarnama
Published on
Updated on

Ujwal Nikam : मावळ : शिवसेनेत (Shivsena) फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे सरकार सत्ते आले आहे. मात्र, राज्यातील सत्तेचा हा पेचप्रसंग थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. उद्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागले आहे. त्यातच या सुनावणीवर महत्त्वाचे भाष्य ज्येष्ठ वकिल उज्वल निकम (Ujwal Nikam) यांनी केले आहे.

निकम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात उद्या सरकारचा निर्णय होईल असे वाटत नाही. कारण अद्यापपर्यंत घटनापीठ स्थापन झाले नाही. घटनापीठाची स्थापना उद्या होईल की नाही हे बघाव लागेल. त्यानंतर घटनापीठ स्थापन झाल्यास ते किती न्यायाधिशांचे असेल त्यावर सर्व गोष्टी अवलंबुन असतील. त्यानंतर घटनापीठापुढे कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत. हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. त्यानंतर युक्तिवाद सुरु होईल, असे निकम यांनी सांगितले.

Ujwal Nikam News
गडकरींना डावलण्याचे बावनकुळेंनी दिले कारण...

त्यामुळे उद्या सरकार बाबत निर्णय होईल असे वाटत नाही. असे स्पष्टीकरण निकम यांनी दिले. मावळ मधील एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ते आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मावळ मधील कोथुर्ण येथील सात वर्षीय बालिका हत्या प्रकरनी सरकरने केस लढविन्याबाबत अद्याप विचारणा केली नसून विचारणा केल्यास निश्चित केस लढवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

Ujwal Nikam News
आमदार शेळकेंना एसपींचा फोन आला म्हणून आज पुणे-मुंबई हायवे ठप्प झाला नाही; अन्यथा...

दरम्यान, शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे. मागील दोन सुनावणीत दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ वकिलांनी घमासान युक्तिवाद केला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र, ही तारीख बदलून 12 ऑगस्ट करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा बदलून 22 ऑगस्ट करण्यात आली.

तर दुसरीकडे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आता 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com