बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Pune District Bank Election) संचालकपदी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. अ वर्ग सोसायटी प्रतिनिधी गटातून बारामतीतून अर्ज दाखल केलेल्या शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे पवार यांची बिनवरोध निवड झाली आहे.
अजित पवार यांनी अ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. सतीश काकडे यांनीही याच गटातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे पवार यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार की ते बिनविरोध होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविलेल्या ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी बुधवारी (दि. ८) सकाळी काकडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर काकडे यांनी अर्ज मागे घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच अजित पवार यांना जिल्हा बॅंकेत बिनविरोध संधी मिळाली आहे.
यासंबंधी काकडे म्हणाले, सामाजिक कारणांसाठी मी अर्ज दाखल केला होता. पवार यांच्याशी सोमेश्वर कारखान्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी काही प्रश्न मार्गी लावले, बाकीचे मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. वास्तविक जिल्हा बॅंकेशी काकडे घराण्याची पूर्वीपासून जवळीक आहे. बॅंक स्थापनेमध्ये स्व. मुगुटराव काकडे, स्व. बाबालाल काकडे यांचा सिंहाचा वाटा होता. सहकाराचा कणा ही बॅंक आहे. पवार यांच्यासारखा कणखर नेता तेथे असणे गरजेचे असल्याने मी अर्ज मागे घेतला. मी शेतकऱ्यांसाठी काम करतो. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असे काकडे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.