Rahul Solapurkar Controversy: राहुल सोलापुरकरांच्या घराबाहेर वंचित अन् RPIचं आंदोलन; कार्यक्रर्ते आक्रमक

Rahul Solapurkar Protest News: वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयचे कार्यकर्त्याच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून राहुल सोलापूरकर यांच्या घराजवळील रस्ते बंद केले आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
Rahul Solapurkar News
Rahul Solapurkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune: छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावरुन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. शिवप्रेमी आणि आंबेडकर अनुयायींनी सोलापुरकर यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आज वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. आंदोलनापूर्वी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीशी बजावल्या आहेत. पुणे पोलिसांच्या नोटीसीनंतरही आंबेडकर कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत. राहुल सोलापूरकर यांच्यावर पुणे पोलीस मेहरबानी करीत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयचे कार्यकर्त्याच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून राहुल सोलापूरकर यांच्या घराजवळील रस्ते बंद केले आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. 1

150 ते 200 पोलिसांचा फौज फाटा सोलापूरकर यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. राहुल सोलापूरकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

Rahul Solapurkar News
Rashmi Thackeray: आशा भोसलेंवर रश्मी ठाकरे संतापल्या; काय आहे नाराजीचं कारण?

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोलापूरकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांना भोवले आहे. पुण्यातील पोलिस ठाण्यात राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्यामध्ये संभाजी ब्रिगेड या संघटनेने राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोलापूरकर यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीनं अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com