Vasant More News : गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल करणारे मोरे कोट्यधीश.. !

More has property like many cars, gold and silver : वसंत मोरे यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता..
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Constituency : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले आणि विविध विषयांवर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या वसंत (तात्या) मोरे यांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही गाजावाजा न करता मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मोरे यांनी शांततेत अर्ज दाखल करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे.

मनसेनेचे 'फायर ब्रँड' नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी गेल्या महिन्यात मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. मोरे यांना लोकसभा निवडणूक लढायची असल्याने त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली दिली आहे. पुणे (Pune) लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. त्यांच्या आणि कुटुंबीयांकडे 4 कोटी 16 लाख 67 हजार 364 रुपयांची मालमत्ता आहे. त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasant More
Ajit Pawar News : महायुतीला धक्का; अजितदादांचा अर्ज नामंजूर !

जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने वंचित बहुजन विकासचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यानुसार पुणे लोकसभेसाठी आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर मोरे यांनी वंचित विकासमध्ये प्रवेश केला आहे.

वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतरदेखील मोरे सोशल मीडियावर चर्चेत होते. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्नदेखील सोडविले होते. सोशल मीडियावर मोरे यांना फॉलो करणाऱ्या तरुणांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना ते वाजत गाजत जातील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र, याला फाटा देत कोणताही गाजावाजा न करता मोरे यांनी आपला अर्ज दाखल केल्याचे दिसून आले.

लोकसभेची (LOK SABHA) निवडणूक लढविणाऱ्या मोरे यांच्यावर 3 कोटी 49 लाख 23 हजार 439, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 18 लाख 89 हजार हजार रुपयांचे कर्ज आहे. मुलाच्या नावावर 47 हजार 147 रुपयांचे कर्ज आहे. मोरे यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. यामध्ये इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी, तर बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक यांचा समावेश आहे. मोरे यांच्याकडे 70 ग्रॅम तर पत्नीकडे 270 ग्रॅम सोने आहे. मोरे यांच्यावर सात गुन्हे दाखल असून, त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे.

R

Vasant More
Ajit Pawar News : अजित पवारांनी इंदापुरात केलेल्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल; कारवाई होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com