Vasant More Leave MNS Party : वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर शहर मनसेची चुप्पी; राज ठाकरेंचा काय होता आदेश?

Vasant More on Raj Thackeray : 'पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतानाही काही ठराविक पदाधिकारी यामध्ये अडचणी आणत होते..
Vasant More Leave MNS Party
Vasant More Leave MNS PartySarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी शहराध्यक्ष आणि पुण्याचे फायर ब्रॅण्ड नेते वसंत मोरे यांनी मनसे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मोरे यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 'अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा" असे मोरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. (Latest Marathi News)

पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असून पक्षात काम करणारे शहरातील पदाधिकाऱ्यांवर त्यांनी त्रास देत असल्याचा आरोप केले आहेत. मनसेमध्ये परत जाण्याचे दोर कापले असून आता पुन्हा तेथे जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावर शहर पातळीवरील पदाधिकारी नेते तसेच मनसेच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र कोणत्याही नेत्याने मोरे यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोरे यांच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नका, असे आदेश पुणे शहरातील नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सर्वच नेत्यांनी यावर बोलण्यात असमर्थ दाखवून गप्प बसणे पसंत केले आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मोरे यांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले जाईल, असे काही पदाधिकाऱ्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

पुणे शहरातून लोकसभेची (Lok Sabha) निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक होतो. त्यासाठी गेले वर्ष-दीड वर्षापासून तयारी करत होतो. सुरुवातीच्या काळात कोणीही यासाठी इच्छुक नव्हते. मात्र मी लढण्याची तयारी दाखवल्यानंतर अचानक चार ते पाच जण यासाठी इच्छुक झाले आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यात चांगली मते मनसेला मिळाली होती. पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतानाही काही ठराविक पदाधिकारी यामध्ये अडचणी आणत होते.

कोअर कमिटीच्या काही सदस्यांना मनसेची ताकद वाढावी, अशी इच्छाच नाही. प्रत्येक वेळी माझ्या पक्ष निष्ठेवर आक्षेप घेत मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही सदस्य करत आहेत. कोअर कमिटीने राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्याकडे नकारात्मक अहवाल पाठवला. माझ्याबद्दल वरिष्ठांकडे सतत नकारात्मक माहिती पुरवली जाते. शहरातील पाच ते सहा पदाधिकाऱ्यांना मनसे संपवायची आहे, असा आरोप देखील मोरे यांनी केला आहे.

वसंत मोरे (Vasant More) यांनी दिलेल्या राजीनाम्यावर तसेच त्यांनी केलेल्या आरोपांवर काहीही बोलू नका, असे आदेश आम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे जेव्हा वेळ येईल त्यावेळेस मोरे यांना योग्य ते उत्तर दिले जाईल. त्यांनी पक्ष वाढीसाठी काय काम केले, कोणत्या भूमिका घेतल्या, पक्षाने त्यांना कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या त्याचा त्यांनी काय फायदा घेतला या सर्वांचा हिशोब वेळ आल्यावर मांडला जाईल, अशी प्रतिक्रिया कोअर कमिटीतील काही सदस्यांनी दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com