Vasant More Meets Amit Thackeray: वसंत मोरे अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

Vasant More News: वसंत मोरेंची नाराजी दूर करण्यास यश येणार?
Vasant More News
Vasant More NewsSarkarnama

Vasant More Meets Amit Thackeray: पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) पुन्हा एकदा नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर यापूर्वीही त्यांच्या नाराजीमुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र आता वसंत मोरे यांना मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी तातडीने भेटायला बोलावलं आहे. त्यामुळे मोरे यांची नाराजी दूर होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमित ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान अमित ठाकरेंनी वसंत मोरे यांना भेटण्यासाठी बोलवलंय. पुणे मनसेतील (Pune MNS) अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे अमित ठाकरे आणि वसंत मोरे यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी पुढाकार घतला आहे. मात्र मोरे यांची नाराजी दूर करण्यास त्यांना यश येणार का? हे पाहणं महत्वाच असणार आहे.

Vasant More News
MNS Leader Join's Shivsena: मनसेला पुण्यात पुन्हा धक्का : शिरूरमधील नेत्याचा तडकाफडकी शिवसेनेत प्रवेश

याआधीही देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही पुणे मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धूसफुस सुरुच आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे यावर नेमकं काय भूमिका घेणार हे पाहण महत्वाच असणार आहे.

दरम्यान, वसंत मोरे (Vasant More) यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) येण्याची ऑफर काही दिवसांपूर्वीच दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर वसंत मोरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा होणार? मोरेंची नाराजी दूर होणार का? या सर्व प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com